अकोट(सारंग कराळे)-14 अगस्ट स्व.विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री स्मृती दिनानिमित्त अकोला नाका ते कालंका चौक रस्त्यावर मंडपात बसुन मुंडन आंदोलन केले.
ह्या रस्त्याकरिता 28 मे 2017 पासुन पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या कडे वारंवार लेखी तक्रार सादर करून तरी कामास सुरवात झाली नाही. जनता दरबारात रस्त्याचे कामाचा पाठपुरावा लेखी तक्रार सुद्धा दिली तरी शासनाला जाग न आल्याने पुन्हा जनता दरबारात पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी केली तरी शासनाने दुर्लक्ष केले . म्हणून 16 मार्च ते 20 मार्च 2018 पर्यंत नगरपालिके समोर मंडपात उपोषण केले.
दि.20 अगस्ट 2018 रोजी नगरपालिकेचे बांधकाम पत्र क्र.269/18 दि.9 अगस्ट 2018 रोजी ला
अकोला नाका ते कालंका चौक 1कोटी 19 लाख 66 हजार 179.
मातंगपुरा ते चंडालिया यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काम 38 लाख 33 हजार 599.
चंडालिया यांच्या घरापासून ते महात्मा फुले चौक (सोमवरवेस धक्का)पर्यंत 72 लाख 58 हजार 616 काम
एकुण रस्त्याच्या कामाचे रक्कम 2 कोटी 30 लाख 58 हजार 394 एकुण तिन्ही रस्त्याचे काम अंदाज पत्रकांना तांत्रिक मंजुरात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय अकोला येथे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी पाठीविले त्याची एक प्रत दि.20 अगस्ट 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार महादेवराव सातपुते यांना देण्यात आले