अकोट(सारंग कराळे)- अकोट शहर पोलिसांच्या रात्र गस्तीच्या पोलिसांच्या सतर्कते मुळे स्थानिक गुरुकृपा मोबाईल शॉप मधून हजारो रुपयाचे मोबाईल चोरी होण्या पासून बचावले , ह्या बाबत प्राप्त माहिती नुसार दिनांक 18 ऑगस्ट चे रात्री उशिरा अकोट शहर पोलिसांचे गस्ती पथक अकोट शहरात पोलीस वाहनसह गस्त करीत असतांना स्थानिक सिंधी कॅम्प मधून गस्त करीत असतांना पोलिस वाहनाचे सायरन ऐकून 2 चोर गुरुकृपा मोबाइल शॉप मधून सामान टाकून पळताना दिसल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता ते अंजनगाव रोड ने मोटर सायकल ने पळाले, अंधारात पोलिसांनी त्यांचा पिच्छा केला परंतु ते मिळून आले नाही, मोटर सायकल चा नंबर न दिसल्याने पुढील कार्यवाही होणे शक्य नसल्याने पोलिस कर्मचारी गणेश पाटील, गुन्हे शोध पथकाचे संजय घायल, विजय सोळंके, राठी, अघडते व इतर कर्मचारी ह्यांनी सिंधी कॅम्प स्थित गुरुकृपा मोबाईल शॉप चेक केले असता बाहेरील कुलूप तुटलेले दिसले ,पोलिसांनी त्वरित मोबाईल शॉप चे मालक राहुल नरेश उदासी व त्यांचे परिवाराला बोलावून मोबाईल शॉप चेक केले असता पोलिसांना शॉप मधील मोबाईल व मोबाईलचे स्पेयर पार्ट फेकलेले दिसले, पोलिसांच्या सायरन चा आवाज ऐकून बराच मोठा मुद्देमाल तसाच टाकून चोरांनी पलायन केले, त्या वेळी मोबाईल शॉपच्या मालकांनी काहीच गेले नसल्याचे सांगितले, परंतु पूर्ण माल चेक करून संध्याकाळी पोलिस स्टेशनला येऊन रिपोर्ट देऊ असे सांगितले, त्यानंतर पूर्ण दुकानाचा माल चेक केला असता छोटे मोठे 10 मोबाईल किंमत 43516 रुपयाचे मोबाईल दिसून न आल्याने सदर मोबाईल चोरून नेले असावे अशी तक्रार दिल्या वरून अकोट शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, चोर अंजनगाव रोड ने पळून गेल्याने सदर चोर बाहेरचे असावे असा पोलिसांना संशय आहे, पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय घायल करीत आहेत।