अकोला– मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (9 ऑगस्ट) क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंद पुकारला होता. अकोला जिल्ह्यातही सकाळपासून कडकडीत बंद पाळला जात होता.
मात्र, अकोटमध्ये मराठा आंदोलनाचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. मराठा समाजाला आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके ऐकायला मिळाले. आंदोलक वधू-वरांना आंदोलनस्थळी एकमेकांच्या गळ्यात हार टाकले.
मिळालेली माहिती अशी की, अकोट तालुक्यातील देऊळगाव येथील तेजस्विनी गावंडे हिचा विवाह ९ ऑगस्ट रोजी गांधीग्रामच्या अभिमन्यू अढाव याच्यासोबत होता. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सदनमध्ये या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. विवाहस्थळी दोन्हीकडील पाहुणेमंडळी उपस्थित होती. तेजस्विनी आणि अभिमन्यूसह दोन्हीकडील मंडळींनी लग्नाआधी मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.यातूनच पुढे आंदोलनस्थळीच लग्न लावण्याचा निर्णय दोन्हीकडील मंडळी आणि पाहुण्यांनी घेतला.
वधू-वर आणि पाहुणे मंडळी शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घोषणाही दिल्या. आरक्षणाच्या घोषणांच्या जागी मंगलाष्टके सुरु झाली. मराठा समाज आणि आंदोलकांच्या साक्षीने अभिमन्यू आणि तेजस्विनी वैवाहिक जीवनाच्या सूत्रात बांधले गेले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola