तेल्हारा (प्रतिनिधी):- आगामी तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणाला चांगलीच रंगत आली आहे. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर लढण्याचा निर्धार केला असून, पक्षाच्या वतीने मायाताई गजानन थाटे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून दि.8 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. शिवसेना उभाटा गटाने “स्वबळावर लढू, विकास घडवू!” हा नारा देत जनतेशी थेट संपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे. मायाताई थाटे या समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकासासाठी ओळखल्या जातात. मागील काही वर्षांपासून त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी जाहीर होताच उत्साहाचे वातावरण असून, उबाठा गट स्वबळावर विजय मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मायाताई थाटे यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटले, “आमचा लढा सत्तेसाठी नव्हे, तर तेल्हाराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. आम्ही जनतेच्या विश्वासावर आणि शिवसेनेच्या विचारांवर उभे आहोत.” त्यामुळे विजय आमचाच होणार असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अजय पाटील गावंडे तेल्हारा शहर प्रमुख विवेक खारोडे वैशाली इंगोले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मयाती थाटे सविताताई मोरखडे गजानन मोरखडे सचिन थाटे सुधाकर गावंडे मनीष गवळी पंकज कवर हेमंत अवचार गौरव धुळे स्वप्निल सुरे अमित आप्पा घोडेस्वार गोपाल जायले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बहुसंख्य उपस्थिती होती.









