तेल्हारा(प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम आरसुळ नजीक एका अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. ग्राम आरसुळ येथील विश्रामगृहा जवळ एका अनोळखी इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.सदर मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटली नसून तेल्हारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रकाश तुनकुलवार हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले असून नेमकी ही हत्या की अजून काही याचा तपास करीत आहेत.










