अकोला : सम्राट चंद्रगुप्त मोर्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथे डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) अकोला या दोन्ही संस्थेचा संयुक्त कार्यक्रम स्थानिक रतनलाल प्लॉट स्थित सम्राट चंद्रगुप्त मोर्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला या संस्थेत होणार आहे. अल्प मुदतीच्या विविध नाविन्य पूर्ण आणि स्वयंरोजगारास पूरक अशा अभ्यासक्रमांचा शुभारंभ येत्या ८ ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होणार आहे.
या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विविध समित्या त्याकरता युद्ध पातळीवर कार्यरत आहेत. संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी या अभ्यासक्रमाचा युवक युवती तथा इतर जे रोजगार आणि स्वंयरोजगार करु इच्छितात अशा सर्वानी आपले प्रवेश ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करुन लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संस्थेमध्येच पार पाडल्या जात आहे.
संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेश शुल्क सद्या फक्त शंभर रुपये ठेवण्यात आलेले असुन डॉ. आनंदीबाई जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला) अकोला या संस्थेत सेल्फ एम्पलायी टेलर , असिटंट ब्युटी थेरीपिस्ट , डिजीटलमित्र वेब डेव्हलपर हे अल्पमुदत अभ्यासक्रम दि.०८ ऑक्टोंबर पासुन सुरु होणार आहेत. तर सिसिटिव्ही इस्टालेशन टेक्नीशन, ज्युनिअर सॉप्टवेअर डेवलपर, असिस्टंट बेकींग टेक्नीशन हे इतर अभ्यासक्रम पुढील महिण्यात सुरु होणार आहे. पंतप्रधानाच्या हस्ते होणा-या उद्घाटन समारंभाला अधिकाधिक संख्येने प्रशिक्षणार्थी तसेच त्यांच्या पालकांनी व नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले आहे.