पातूर(सुनील गाडगे) :- पातुर येथे देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त देशभरात सेवा पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टी पातूर शरद मंडळ च्या वतीने आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन सावित्रीबाई फुले विद्यालय, पातूर येथे करण्यात आले होते. या शिबिरासाठी पातुर येथील आमदार डॉ.राहुल पाटील शैक्षणिक संकुलातील, नलिनीताई राऊत आयुर्वेद रुग्णालयाने पुढाकार घेतला. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालयात संपन्न झालेल्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरात शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला, रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली., तसेच नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे व आय ड्रॉप्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
रुग्णालयाचे संचालक डॉ.साजिद शेख व जनसंपर्क अधिकारी धनंजय भाऊ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी डॉ.वसीम सर, डॉ.आशिष केचे, डॉ.नितीन शेंडे, डॉ.मोरे डॉ.बेलोरकार, डॉ.अजमल खान, डॉ.प्रतिश उंबरे, डॉ.गणेश मिटकरी, डॉ.नुझहत अंजुम, डॉ.बुशरा वसिक, डॉ.उन्नती सोनकर, डॉ.शाहिदा पटेल, गजानन पाटील, वसंत पोहरे या वैद्यकीय टीमने सेवा दिली. पातुर शहराध्यक्ष गणेशभाऊ गाडगे भारतीय जनता पार्टी यांनी या आरोग्य शिबिराचे नियोजन केले होते,या शिबिरा करता भाजपाचे भिका भाऊ धोत्रे, सौ.वैशालीताई निकम, चंद्रकांत अंधारे,राजूभाऊ उगले, कपिल खरप,संदीप गाडगे, संदीप तायडे, मंगेश केकन सचिनभाऊ ढोणे, दिगंबर गोतरकर,हिरालाल चौरे सुनिल गाडगे,विठ्ठल काळे, लोथे सर्, सौं लोथे मॅडम सौ.तुळसाबाई गाडगे,नंदा काळे,मंजुषा लोथे,नीता उंबरकर ई. पदाधिकारी उपस्थित होते.