अकोला– दिनांक १२/०५/२०२५ रोजी फिर्यादी नामे डॅ. राहुल विलास सुरूशे, वय ३५ रा. रामकृष्ण नगर, मेन रोड, मलकापुर अकोला अकोला यांनी पोलीस स्टेशन खदान येथे तकार दिली की, त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये गुंतवणूक केली की जास्त नफा मिळवून देईल असे आश्वासन दिले, त्यानंतर फिर्यादी यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याचे सांगण्याप्रमाणे एकूण ६०,३८,२००/- रूपये रकमेची गुंतवणूक केली. त्यानंतर फिर्यादी यांनी झालेल्या नफ्याबाबत अज्ञात व्यक्तीस विचारणा केली असता फिर्यादीस उडवाउडवीचे उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले वरून त्यांनी पो. स्टे. खदान येथे अप क. ४०६/२०२५ कलम ३१८ (४), बी.एन.एस. सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सदर तपास मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे आदेशाने सायबर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच डिजिटल खुणा आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. दिनांक १८/०९/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक साहेबाच्या आदेशाने पोस्टे खदान येथुन पोउपनि. नरेंद्र पदमणे, पो. अंम. महेंद्र सपकाळ व पोस्टे सायबरचे पोहवा. प्रशांत केदारे, पो. अमं. अतुल अजने व तेजस देशमुख महीला पो. अंम. सपना अटकलवाड आरोपी अटक कामी इंदौर, मध्य प्रदेश येथे खाना झाले. आरोपीचा शोध घेतला असता महिला आरोपी नामे तनवीर शहादाब समीर कौसद वय ४६, रा. बीयाबानी, प्रमाकुमारी हॉस्पीटल के पास, इंदौर, मध्य प्रदेश याला दिनांक १९/०९/२०२५ रोजी स्थानिक पोलीस यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असुन दिनांक २०/०९/२०२५ रोजी प्रथम वर्ग न्यायालय, अकोला येथे हजर केले असता मा. न्यायालयाने दिनांक २५/०९/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक साो. अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. दिपक कोळी, सपोनी मनिषा तायडे पोस्टे. सायबर अकोला, नरेंद्र पदमणे, पो.अंम. महेंद्र सपकाळ व पोस्टे सायबरचे पोहवा. प्रशांत केदारे, अतुल अजने व तेजस देशमुख महीला पो. अंम. सपना अटकलवाड यांनी सदरची कार्यवाही केली आहे.