तेल्हारा(आनंद बोदडे) आज तेल्हारा विश्राम भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेतस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांवरील कर्ज वसुली विरोधात मोठा ‘आसुड मोर्चा’ जाहीर केला. हा मोर्चा सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता टॉवर चौक ते तहसील कार्यालय, तेल्हारा या मार्गाने काढला जाईल. शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठीच्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे डिक्कर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत डिक्कर म्हणाले, “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याची मागणी आम्ही ठामपणे करतो.
कापूस, सोयाबीन व तुरीसारख्या पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव देण्यात यावे. शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याण महामंडळ स्थापन करावे. तेल्हारा तालुक्यातील गावांना वाण धरणातून तात्काळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा. सततच्या पावसामुळे, हुमणी अळी व येलो मॉझेकमुळे सोयाबीन उत्पादन प्रचंड घटले असल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करावे. तसेच, शालेय पोषण आहारात केळीचा कायम समावेश करून केळी पिकाला हमीभावाचे धोरण ठरवावे. या मागण्यांसाठी शेतकरी व शेतमजूर एकजुटीने लढतील.”प्रमुख मागण्या:शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा: बँका व आर्थिक संस्थांकडून होणारी कर्ज वसुली तात्काळ थांबवा. प्रशांत डिक्कर यांनी आवाहन केले की, या मोर्च्यात शेतकरी, शेतमजूर व सर्व समाजकल्याणकार्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. मोर्चा शांततेने व शिस्तबद्धपणे काढला जाईल, यावेळी स्वराज्य पक्षाचे गणेश आमले, कुलदीप बाजारे,मुन्ना पाटील मनतकार यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.