अकोला(प्रतिनिधी)- अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक 31.07.2026 आज स्थानिक गुन्हे शाखा चे पथकाला पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरातील अमनदीप हॉटेल जवळ मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे आम्ही अन्न सुरक्षा अधिकारी याना सोबत घेऊन आरोपी नामे 1) फरहान खान रसूल खान वय 34 वर्षे रा. मिठी बावडी बैधपुरा अकोला 2) शाहरुख शेख युसुफ चव्हाण वय 30 वर्षे रा. मिठी बावडी बैधपुरा अकोला यांचेवर 18.00 वा. पंचासमक्ष रेड केला असता त्यांचे ताब्यात शासनाने प्रतिबंधक केलेला पान मसाला गुटखा 79,367/- रुपये चा मुद्देमाल मिळून आल्याने अन्न सुरक्षा अधिकारी यांचे फिर्याद वरुण पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक,बी. चंद्रकांत रेड्डी साहेब, शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शना खाली PSI विष्णु बोडखे GPSI दशरथ बोरकर HC गोकुळ चव्हाण HC सुलतान पठाण Pc स्वप्निल खेडकर Pc अन्सार Pc सतीश यांनी केली.