पातूर (सुनिल गाडगे): अकोला येथील क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पातुर तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. महल्ले बुधवारी रात्री बारा च्या सुमारास घरी जात असताना खदान परिसरात तीन आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांना जबर मारहाण केली. या घटनेमुळे जिल्ह्यात पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पातूर तालुक्यातील पत्रकारांनी पोलिस स्टेशन पातूर येथे पोलीस निरीक्षक हनुमंत टोपेवाड यांना निवेदन देऊन आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करन आरोपीवर कठोरात कठोर शासन व्हावे ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढणे गंभीर बाब आहे.
विठ्ठलराव महल्ले यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे पत्रकारांनी म्हटले आहे. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे. अन्यथा, पातुर तालुक्यातील पत्रकार आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी पत्रकार प्रदीप काळपांडे,उमेश देशमुख,सतीश सरोदे,मोहन जोशी,निखिल इंगळे, राहुल देशमुख, भावेश गिरोळकर, रामेश्वर वाडी,पंजाबराव इंगळे,दुलेखान युसूफखा,नाजीमुद्दीन शेख, तवकीर अहमद,नातिक अहमद, किरण कुमार निमकंडे,सय्यद साजिद, संगीता इंगळे,अब्दुल
कूद्दुस शेख,श्रीकृष्ण शेगोकार, प्रमोद कढोणे, स्वप्निल सुरवाडे, सुनील गाडगे, संजय बंड,सचिन मुर्तडकर,आदी पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.