तेल्हारा (आनंद बोदडे )- तेल्हारा येथे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते बिहार सरकारचा 1949 चा व्यवस्थापन समितीचा कायदा रद्द करण्यात यावा आणि महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आंदोलन केले या मोर्चाची सुरवातीत डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून करण्यात आली आणि त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार यांचे मार्फत राष्ट्रपती व पी.एम.मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले यावेळी तेल्हारा तालुक्यातील हजारो बौद्ध बांधव सहभागी झाले मोर्चाचे नेतृत्व पूज्य. भदंत महानाम पंचवर्गीय व अशोक दारोकार तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांचे नेतृत्वामध्ये व
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, मिलिंद इंगळे महासचिव,यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी नाजूकराव दारोकार भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष भंते नागसेन,सिद्धार्थ शामस्कार, दादासाहेब वरठे ,मधुसूदन बरिंगे, प्रकाश खोब्रागडे प्रदीप तेलगोटे, जीवन बोदडे, बापुराव भोजने,आम्रपाली गवारगुरू माजी सभापती, संघपाल वाकोडे,पंजाबराव दुसेकर,झिया शाह संदीप गवई,अजय शामस्कर रवींद्र खर्चे,विलास हिवराळे, विकास पवार ,गोवर्धन पोहरकर, आनंद बोदडे , सिद्धार्थ गवारगुरू प्रफुल मोरे, प्रवीण पोहरकर सदानंद खारोडे ,देवराव दामोदर, पंजाब तायडे, बाळुभाऊ तायडे मो. इद्रीस,विनोद गव्हांदे, ॲड भूषण तायडे,विद्याताई शामस्कर, संतोषीताई निकाडे, मीना बोदडे पंचफुला वाकोडे,रंजना वानखडे ज्योती वानखडे,अमर भारसाकडे, सागर सुरळकर,संघर्ष बोदडे, माजी सैनिक बाळासाहेब बोदडे देविदास तायडे ,भानुदास शिवणकर,नरेश बांगर,रमेश वाकोडे प्रवीण उरकडे राजू वरठे भारत पोहरकर सुरेंद्र भोजने,विनोद सरदार,संजय वानखडे विलास दामोदर,संजय वानखडे, रविंद्र विरघट यांचे सह वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा विद्वत सभा,वंचित बहुजन महिला आघाडीचे आजी माजी पदाधिकारी तसेच बौद्ध बांधव उपस्थित होते