पातूर *(सुनिल गाडगे)* : तालुक्यातील सर्वात मोठया ग्रामपंचायत असलेल्या आलेगाव येथे आज दुपारी 12 वाजता वनविभाग च्या पथकाने धाड टाकून लाखो रुपया चा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाई मुळे तालुक्यातील अवैध सागवान तस्करांचे धाबे दानाणले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि आलेगाव जवडील जांब फाटा येथिल न्यू वूड फर्निचर चे दुकानात अवैधपणे सागवान चि कटाई होत असल्याचि गुप्त माहिती पथकाला मिळाली असता त्या ठिकाणी वनविभाग ने धाड टाकून सागवान गोल व चौरस मालाची साठवणूक आढळून आली यात चौरस नग 260घ. मि. 1418 किंमत 1लाख तेहतीस हजार चारशे तेवीस रू. व सागवान गोल 51घ. मि. 3118 किंमत 2 लाख वीस हजार चौतीस रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फर्निचर मालक अजहर खान ताय्युब खान व शेख वाजीद शेख सलीम यांना अटक करण्यात आली असून सदर चि कारवाई कुमारस्वामी s. R. उपवनसंरक्षक अकोला, s. k खुणे सहा. उपवन संरक्षक यांच्या मार्गदर्शन खाली s. D. गव्हाणे वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली