• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

Our Media by Our Media
January 24, 2025
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
Nitin Gadkari
12
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : विदर्भाच्या विकासासाठी किमान 50 हजार कोटींचे सामंजस्य करार एडवांटेज विदर्भमध्ये होतील असा विश्वास केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्‍यक्‍त केली. नागपूर एव्हिएशन आणि लॉजिस्टिक हब व्हावे यासाठी प्रयत्न असून, गडचिरोलीचा पोलाद प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होणार असल्याचे सांगितले. दाओस येथे झालेल्या सामंजस्य करारापैकी विदर्भात नेमके किती कोटींचे उद्योग आलेत, या विषयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः देतील असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) द्वारे 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कॅम्पस ग्राउंड येथे ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ खासदार औद्योगिक महोत्सव’ चे आयोजन करण्‍यात आले आहे. पत्र परिषदेत याविषयीची माहिती देण्यात आली. गडकरी म्‍हणाले, आपली प्राथमिकता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, दृष्टीने मागासलेला गडचिरोली जिल्हा असून आगामी पाच वर्षात गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा ठरेल हे स्वप्न आता पूर्ण होण्याकडे वाटचाल करत आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी खासदार श्याम बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार चरणसिंग ठाकूर, माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती, बैद्यनाथचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश शर्मा, असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू राजेंद्र काकडे, आयआयएम नागपूरचे संचालक भीमराया मैत्री, विजय शिरसाठ, हिमा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गडकरी पुढे म्हणाले की, नागपूरला आपल्याला लॉजिस्टिक कॅपिटल बनवायचे आहे. अजनी, मुख्य स्थानकाचा विकास रेल्वे करणार, असून त्यासाठी राज्य सरकार आणि एनएचएआयतर्फे देऊ करण्यात आलेला निधी आता सिंदी ड्रायपोर्टसाठी वापरला जाणारा आहे. एसईझेड, मिहानमध्ये तीन वर्षात तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. मोठ्या प्रमाणात उद्योग येत असून मिहानचे विस्तारीकरण करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. मदर डेअरीच्या 670 कोटींच्या निर्यातक्षम दुग्धजन्य पदार्थांच्या प्रकल्पाचे देखील काम सुरू होत असल्याचे सांगितले. विदर्भातील तरुणांमध्ये क्षमता मोठी असून त्यांना कुशल मनुष्यबळाच्या दृष्टीने प्रशिक्षण आणि संधी मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विदर्भातील लोकप्रतिनिधी, उद्योग, औद्योगिक संस्‍था व संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्‍हावे व विदर्भाच्‍या विकासात हातभार लावावा, असे आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुंबईतील थाई कॉन्सुल-जनरल डोनावित पूलसावत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र सरकारचे आयटी मंत्री आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) आणि खाणकाम राज्यमंत्री पंकज भोयर, भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे, लॉयड्स स्टील अँड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

तसेच, युनिकॉर्नचे संस्थापक, ज्यात बोटचे सह-संस्थापक आणि सीएमओ अमन गुप्ता, नोब्रोकर डॉट कॉमचे संस्थापक अखिल गुप्ता, प्रिस्टिन केअरचे सह-संस्थापक वैभव कपूर, पॉलिसीबाजारचे अध्यक्ष आणि सीईओ सर्ववीर सिंग आणि अपनाचे सीईओ निर्मित पारीख हे स्टार्ट अप सेक्टर सत्रांमध्ये कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

औद्योगिक प्रदर्शनात विविध प्रकारचे 300 स्‍टॉल्‍स असतील. १०० सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव असतील. इतर स्टॉलमध्ये संरक्षण सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम), शैक्षणिक संस्था यासारख्या सरकारी विभागांकडून विविध क्षेत्रातील उत्पादन श्रेणी, यंत्रसामग्री आणि सेवा प्रदर्शित केल्या जातील.

भंडारा येथील ऑर्डिनन्‍स फॅक्टरीमध्‍ये झालेल्‍या स्‍फोटातील मृतकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्‍यात आली. एआयडीचे अध्यक्ष सचिव डॉ. विजय शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. एआयडीचे  उपाध्यक्ष गिरधारी मंत्री आणि प्रणव शर्मा; कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी यांच्यासह कार्यकारी समिती सदस्य प्रशांत उगेमुगे, राजेश रोकडे, रवींद्र बोरटकर, महेंद्र क्षीरसागर, निखिल गडकरी, विनोद तांबी, महेश साधवानी, संजय गुप्ता, अविनाश घुशे यावेळी उपस्‍थ‍ित होते.

Previous Post

मेगा भरती ! रेल्वेमध्ये ३२ हजारांहून अधिक जागांसाठी आजपासून करता येणार अर्ज

Next Post

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
ST BUS

प्रवाशांच्या खिशाला कात्री 'लालपरी' चा प्रवास महागला

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.