अकोला : वाहन तपासणी, वाहनचालक अनुज्ञप्ती याबाबत कामकाजासाठी जानेवारी ते जून या कालावधीतील तालुकास्तरीय शिबिरांचे नियोजन प्रादेशिक परिवहन अधिका-यांकडून जाहीर करण्यात आले आहे.
जानेवारी ते मार्च :
जानेवारी महिन्यात बाळापूरला 2 जानेवारी, मूर्तिजापूर येथे 6, 17 व 27, अकोट येथे 8, 22 व 30, तेल्हा-यात 10, पातूरला 13 व बार्शिटाकळीमध्ये 24 तारखेला शिबिर होईल.
फेब्रुवारी महिन्यात बाळापूरला 3 फेब्रुवारी, मूर्तिजापूर येथे 7, 18 व 25, अकोट येथे 12, 21 व 27, तेल्हा-यात 14, पातूरला 5 व बार्शिटाकळीमध्ये 28 तारखेला शिबिर होईल.
मार्च महिन्यात बाळापूरला 6 मार्च, मूर्तिजापूर येथे 5, 19 व 27, अकोट येथे 7, 12 व 24, तेल्हा-यात 17, पातूरला 13 व बार्शिटाकळीमध्ये 28 तारखेला शिबिर होईल.
एप्रिल ते जून :
एप्रिल महिन्यात बाळापूरला 2 एप्रिल, मूर्तिजापूर येथे 9, 21 व 29, अकोट येथे 11, 17 व 28, तेल्हा-यात 7, पातूरला 23 व बार्शिटाकळीमध्ये 30 तारखेला शिबिर होईल.
मे महिन्यात बाळापूरला 2 मे, मूर्तिजापूर येथे 5, 15 व 23, अकोट येथे 7, 21 व 29, तेल्हा-यात 13, पातूरला 26 व बार्शिटाकळीमध्ये 28 तारखेला शिबिर होईल.
जून महिन्यात बाळापूरला 2 जून, मूर्तिजापूर येथे 4, 12 व 23, अकोट येथे 6, 18 व 27, तेल्हा-यात 9, पातूरला 25 व बार्शिटाकळीमध्ये 30 तारखेला शिबिर होईल.