अकोला : ( अकोट- पोपटखेड) मार्गावर टिप्परने दुचाकी चालकास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना ५ डिसेबरला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी टीप्पर चालकास पोलिसांनी अटक केली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड परिसरातील गावांमध्ये गिट्टी क्रशर, मुरुम मोठ्या प्रमाणात असून, या भागातून दररोज अकोटकडे मोठमोठे टीप्पर गौण खनिजाची वाहतूक करतात. ५ डिसेंबर रोजी पोपट खेडवरून अकोट कडे मुरूम घेऊन येत असलेल्या टिप्पर क्रमांक डब्ल्यू. बी. ३९९०३३ चा चालक याने समोरून येत असलेल्या एमएच ३० एक्यु ३७०१ क्रमांकाच्या दुचाकी चालक मोहम्मद नाजीम अब्दुल मजीद रा. अकोट या युवकास धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यु झाला.
याप्रकरणी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून अकोट ग्रामीण पोलिसांनी टिप्परचालक विजय अंगारे विरुध्द कलम २८१, १०६ (१), ३२४ (४) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.