अकोला दि. 4 : जिल्ह्यातील 5 मतदार संघांत विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दाखल वैध 113 अर्जांपैकी 43 व्यक्तींनी उमेदवारी मागे घेतली. आता 70 उमेदवार कायम आहेत. अकोला पूर्व (उमेदवारी मागे घेतलेले 6 व निवडणूक लढविणारे 11 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून विशाल भगवान पाखरे, महेश भगवंतराव महल्ले, महेंद्र रमेश भोजने, बुद्धभूषण दशरथ गोपनारायण, सुभाषचंद्र वामनराव कोरपे, संजय वसंतराव वानखडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
अकोला पश्चिम
अकोला पश्चिम (उमेदवारी मागे घेतलेले 7 व निवडणूक लढविणारे 13 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून संजय बाबुलाल बडोणे, प्रकाश त्र्यंबकराव डवले, मिर्झा इम्रान बेग मिर्झा सलीम बेग, नंदकिशोर रामकृष्ण ढोरे, मदन बोदुलाल भरगड, जिशान अहमद हुसेन, नकीर खान अहमद खान यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
बाळापुर
बाळापुर (उमेदवारी मागे घेतलेले 6 व निवडणूक लढविणारे 20 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून प्रकाश मोतीराम डिवरे, अरविंद मोतीराम महल्ले, राजेश दादाराव देशमुख, शिवकुमार रतिपालसिंग बायस, शेख अहमद शेख शब्बीर, अमोल प्रमोद घायवट यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
अकोट
अकोट (उमेदवारी मागे घेतलेले 8 व निवडणूक लढविणारे 11 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून नामांकन अर्ज मागे घेण्याचे शेवटच्या दिवशी रामकृष्ण लक्ष्मण ढिगर, यशपाल यशवंत चांदेकर, गजमफरखाँ मुजफ्फर खाँ, दिवाकर बळीराम गवई, देवेंद्र अशोकराव पायघन, सुभाष श्रीराम रौंदळे, डॉ. गजानन शेषराव महल्ले, सय्यद यावर अली सय्यद मुकद्दर अली यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले.
मुर्तिजापुर
मुर्तिजापुर (16 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. निवडणूक लढविणारे 15 उमेदवार) विधानसभा मतदारसंघातून अरूण सखाराम गवई, गजानन शिवराम वझिरे, गोपाळराव हरिभाऊ कटाळे, गयाराम भोंदरू घोडे, पुष्पताई महादेवराव इंगळे, पंकज ओंकार सावळे, भाऊराव सुखदेवराव तायडे, महादेव बापुराव गवळे, महेश पांडुरंग घनगाव, रविंद्र नामदेव पंडीत, राजकुमार नारायण नाचने, राजेश तुळशीराम खाडे, विनोद बाबुलाल सदाफळे, सिध्दार्थ ब्रम्हदेव डोंगरे, सुनिल जानराव वानखडे, संतोष देविदास इंगळे