• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कसा राहील पाऊस ?

Our Media by Our Media
August 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
160 2
0
Rain
23
SHARES
1.2k
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. मान्सूनच्या उत्तरार्धात भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. दक्षिणेचा मध्य भाग आणि लगतचा उत्तर द्वीपकल्पीय भारत, ईशान्य, लगतच्या पूर्व भारताचा भाग तसेच वायव्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे (IMD) म्हणणे आहे. मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात १०६ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण भारतात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

या भागांत मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी

पण मान्सूनच्या उत्तरार्धात ईशान्य, पूर्व भारतातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, जुलैमध्ये भारतात सरासरीपेक्षा ९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. “पंजाब, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये जुलैमध्ये कमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये वायव्य भागात सरासरीपेक्षा १४.३ टक्के कमी पाऊस पडला,” असे IMD ने म्हटले आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, गंगेच्या खोऱ्यातील बंगाल आणि ओडिशासह पूर्व भारतात जुलैमध्ये कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने पुढे नमूद केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

ऑगस्टमध्ये कसा राहील पाऊस ?

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण भारतात चांगला पाऊस होईल. दरम्यान, या कालावधीत मध्य भारतात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. दरम्यान, पुढील ५ दिवस मध्य प्रदेश, महाराष्ट्रात अतिवृष्टीचा रेड अलर्ट राहील. ८ ऑगस्टनंतर पुढील काही दिवस संपूर्ण भारतात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने मे महिन्यात जाहीर केलेल्या अंदाजात, संपूर्ण देशात या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर २०२४) सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला होता. यंदा दीर्घ कालावधी सरासरीच्या (LPA) तुलनेत १०६ टक्के पाऊस राहील, असे सांगण्यात आले होते.

मध्य महाराष्ट्र, कोकणमध्ये अतिवृष्टीचा इशारा

१ ते ३ ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Previous Post

जिल्ह्यात आजपासून महसूल पंधरवडा

Next Post

SC आणि ST आरक्षणाचा लाभ फक्त एकाच पिढीला मिळावा – सर्वोच्च न्यायालयाचे मत

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
Supreme-Court

SC आणि ST आरक्षणाचा लाभ फक्त एकाच पिढीला मिळावा - सर्वोच्च न्यायालयाचे मत

Supreme-Court

दिल्‍लीतील कोचिंग सेंटर्स बनली आहेत 'डेथ चेंबर्स' : सर्वोच्‍च न्‍यायालय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.