तेल्हारा (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम बांधवांना कब्रस्तान मध्ये जान्या येण्या करिता जो रस्ता आहे त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सदर नाल्यातील रस्त्यावर चिखल व खोल वाटा असल्यामुळे मुस्लिम बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच मुस्लिम बांधवांना कब्रस्तान मध्ये अंत्यविधी व विविध धार्मिक विधीसाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून अंत्यविधी करिता मुस्लिम बांधवांना आता ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी नगरपरिषद तेल्हारा यांच्याकडे २६ जुलै ला केली आहे.
कब्रस्तान रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागावा याकरिता रस्ता विकास संघर्ष समितीच्या वतीने व मुस्लिम बांधवांच्या वतीने या एक-दोन वर्षांमध्ये अनेक वेळा नगर पालिके कडे निवेदन सादर करून रस्त्याबाबत मागणी करण्यात आली होती तसेच आ. प्रकाश भारसाकळे यांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करून रस्त्याबाबत लवकर निर्णय घेऊन रस्ता करण्याची मागणी करण्यात आली होती सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले होते आंदोलनास्थळी मुख्याधिकारी यांनी भेट देऊन रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन देऊन सभेमध्ये ठराव घेऊन इस्टिमेट सुद्धा तयार केले होते परंतु शासन निधी अभावी कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न सुटू शकला नाही परंतु हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण किती दिवस रेंगाळत ठेवणार आहात इतर कामे होतात परंतु कब्रस्तानचा प्रश्न सुटत नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.
कब्रस्तानच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून कब्रस्तान मध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर सर्वत्र चिखल झाल्यामुळे व चिखलात पाय फसत असल्यामुळे या रस्त्यांमधून मार्ग काढणे कठीण झाले आहे आम्हा मुस्लिम बांधवांना अंत्यविधी व विविध धार्मिक कार्याकरिता या रस्त्यांमधून मार्ग काढणे कठीण झाल्यामुळे अंत्यविधी करिता आता ट्रॅक्टर व इतर वाहनांचा उपयोग करावा लागत आहे. शेतकरी बांधवांना सुद्धा कब्रस्तान कडे जाणारा रस्ता शेती करिता अत्यंत महत्त्वाचा असून शेता मध्ये जाण्याकरिता या रस्त्यांची शेतकरी बांधवांना सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता अनेक महिन्यांपासून न. प. कडे पाठपुरावा करण्यात आला परंतु सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही अशा गंभीर प्रश्नाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आम्हा सर्व मुस्लिम बांधवांचा वाली आहे तरी कोणी ? असा प्रश्न आम्हाला पडला असून आम्ही या शहराचे रहिवासी आहो की नाही हे शासनाने व आपण सुध्दा एक वेळा जाहीर करून टाकावे नाहीतर राष्ट्रीय एकात्मता जोपासून कब्रस्तानच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन मुस्लिम बांधवांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली असता मुख्याधिकारी यांनी या काही दिवसांमध्ये जिथं शक्य होईल तिथं मुरूम टाकून रस्ता दुरुस्तीचे काम करू असे आश्वासन दिले व निधी उपलब्ध झाल्यानंतर रस्त्याचे परिपूर्ण काम करण्यात येईल असे आश्वासन दिले या वेळी निवेदन देताना शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .