तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून धाडसी चोरींचे सत्र सुरूच असून आज पुन्हा भरदिवसा एका घरात चोरट्यांनी डल्ला मारला. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील साई मंदिर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून धाडसी चोरींच्या घटना वाढल्या असून भरदिवसा पोलिसांना आवाहन देत चोरटे चोरी करीत आहेत आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ज्ञानदेव गव्हाळे यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटामधील नगद ३७ हजार रुपये चोरल्याची माहिती मिळाली असून तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे, हे कॉ राजू इंगळे यांनी घटनास्थळ पंचनामा केला आहे. यासंबंधी घरमालक हे चोरीची तक्रार देणार आहेत.
एका तासात चोरट्यांनी मारला डल्ला
घरमालकाचा मुलगा व सून हे शाळेमध्ये मुलांना आणण्याकरिता गेले असता जवळपास पाऊण एक तास त्यांना लागला या वेळेत चोरट्यानी आपला डाव साधला.
भरदिवसा चोरींच्या घटना
गेल्या काही महिन्यात चोरींच्या घटना वाढल्या असून एकाच दिवशी पाच चोरींच्या घटना साई मंदिर परिसरातील आजू बाजूच्या परिसरात घडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने भर दिवसा चोऱ्या होत असल्याने या परिसरातील रहिवाशी भयभीत झाले असून दिवसा घरांना कुलूप लावून घरामध्ये राहावे लागत आहे. तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने पोलिसांचा वचक व कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.