तेल्हारा (प्रतिनिधी)- तेल्हारा तालुक्यात सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे विकास पवार मित्रपरिवार तर्फे तेल्हारा तालुक्यातील आणि शहरातील रुग्णांच्या सेवेसाठी दि 6 जुलै ला आधुनिक व सुसज्ज अश्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच तालुक्यातील गरीब व गरजू लोकांचे मोफत मोतियाबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. रुग्णवाहिकेचे लोकार्पण हे आय आर एस अधिकारी तथा एडिशनल कमिशनर भारत सरकार समीर वानखेडे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रम ला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता ताई अढाऊ, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोलजी मित्तल (IPS), जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर, सभापती जिल्हा परिषद मायाताई संजय नाईक, समाधान सोनवणे तहसीलदार तेल्हारा, डॉ संतोष येवलीकर तहसीलदार मानोरा, डॉ अशोक तापडिया , मूलचंदजी राठी सोबतच जिल्ह्यातील व तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
विकास पवार मित्रपरिवार तर्फे तेल्हारा तालुक्यातील लोकांना आव्हान करण्यात येते की आपण नेत्र तपासणी शिबिराचा व शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घ्यावा. सोबतच तालुक्यातील व शहरातील लोकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रम ला उपस्थित राहून आम्हला आशीर्वाद द्यावा.