अकोला,दि. 25:- कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित शंका व प्रश्नांचे समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुरू आहे. टोल फ्री कक्षामध्ये संपर्कासाठी 1800 233 4000 हा लॅन्डलाईन व 9822446655 हा मोबईल व्हाट्सअप क्रमांक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. खालीलप्रमाणे शंकांचे निरसन करण्यासाठी शेतकरी बांधव कृषी विभागाशी संपर्क करू शकतात.
टोल फ्री क्रमांक 1800 233 4000
- संपूर्ण वर्षभर सुरू आहे.
- खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत उपलब्धता गुणवत्ता बाबत शंका निरसन करण्यासाठी.
- कृषी विभागाचे निगडित मृदा संधारण विस्तार सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण इत्यादी संबंधित शंकांचे निरसन करण्यासाठी. संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात.
टोल फ्री क्रमांक 9822446655
- केवळ संदेश पाठवण्यासाठी.
- खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकऱ्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवणेसाठी उपलब्ध आहे.
सदर टोल फ्री क्रमांक कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ८:०० वाजेपर्यंत सुरु राहील. शेतकरी बांधवांनी सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून व मार्गदर्शन घेवून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.