तेल्हारा(प्रतिनिधी)- अकोला लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन उद्या दिनांक २२ जून रोजी स्थानिक माहेश्वरी भवन तेल्हारा येथे दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. याप्रसंगी मतदार संघाचे नवनिर्वाचित युवा खासदार अनुप धोत्रे, अकोला पुर्व चे लोकप्रिय आमदार प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, अकोट मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश भारसाकळे ,विधान परिषदेचे आमदार वसंतजी खंडेलवाल, माजी कामगार मंत्री डॉ.संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार हरीषजी पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, मा.आमदार गोपीकीशन बाजोरिया, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील अवचार व भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील उपस्थित राहतील.तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.