• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मोदी सरकारचा पहिला मोठा निर्णय…

Our Media by Our Media
June 10, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
141 1
0
अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की… मोदींनी पत्र ट्विट करत आंदोलक शेतकऱ्यांना केलं आवाहन
20
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

मोदी ३.० सरकारचा पहिला निर्णय देशातील करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली.

९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान निधीच्या १७  व्या हप्त्याचे प्रकाशन अधिकृत करणाऱ्या फाइलवर त्यांनी स्वाक्षरी केली. याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून २० हजार कोटी रुपयांचे वितरण होईल. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू. यापूर्वी, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, १६ व्या हप्त्याचे पैसे २८ फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले गेले होते. देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. तथापि, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत, ही रक्कम एकरकमी नाही तर २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

मोदींची हॅट्ट्रीक

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. एनडीए आणि भाजपाचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड झाली होती. त्यानंतर रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशस आणि सेशेल्स यांसारख्या शेजारील देशाचे प्रमख यांच्‍यासह विविध क्षेत्रातील तब्बल 8,000 पाहुणे शपथविधीला उपस्थित होते.

Previous Post

मुलींचे आयटीआय येथे बुधवारी मेळावा पं. उपाध्याय रोजगार महिला मेळाव्याद्वारे 85 पदे भरणार

Next Post

मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर, नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्री

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
नितीन गडकरी

मोदी सरकारचे खाते वाटप जाहीर, नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा रस्ते वाहतूक मंत्री

Supreme-Court

NEET परीक्षा निकाल घोळाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.