अकोला(प्रतिनिधी)-06 रोजी अकोला जिल्हाधिकारी माननीय अजित कुंभार सर यांच्या आदेशाने तसेच अकोला निवासी उप_जिल्हाधिकारी विजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनात बार्शीटाकळी तहसीलदार राजेंद्र वजीरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत एसडीआरएफ टीम कडुन काटेपुर्णा डॅमवर मान्सूनपूर्व रंगीत तालीम आणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले यामधे बोट चालविण्याचे तसचे पोहण्याचे प्रकार यासह घरगुती साहीत्या पासुन शोध बचाव साहित्य बनविने यांचे प्रात्यक्षिक एसडीआरएफ च्या जवानांनी धरणात करुन दाखविले उपस्थितांना तहसीलदार राजेंद्र वजिरे, एपिआय गजानन तडसे पातुर तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम तथा जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी केले.
या प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब. बार्शीटाकळी नैसर्गिक आ.वि.सुशांत आठवले, सह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे हरीहर निमकंडे, सुनिल कल्ले, दिपक सदाफळे जिवरक्षक, प्रशांत सायरे, श्रावण भराडी, दिपक सोळंके, वसंत पारस्कर, सुदेश चराटे, सागर बोनगीरे, एस.ओ.गायगोळ, राजेश धामणेकर, राहूल चव्हाण, मनिष हळदे, गिरधर झळके, सचिन म्हसने, अरुण घाडगे, राजु चवरे, दिपक देशमुख, संदीप पळसपगार ईतर सर्व मंडळ अधिकारी, तलाठींसह पं.स.चे वि.अ.विजय किर्तने आणी कर्मचारी तसेच विविध विभागांचे शासकीय प्रतिनीधी सह अग्निशमन विभाग,पोलीस, महसुल,होमगार्ड सह सामाजिक संस्था, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर, वंदेमातरम आपात्कालीन पथक, काटेपुर्णा, मा चंडीका आपात्कालीन पथक कुरणखेड, डाॅ.सुधीर कोहचाळे आर एलटी विद्यालय आपात्कालीन पथक अकोला, सह मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. पुर परीस्थीती निर्माण झाल्यास अशावेळी शोध व बचाव करणे तसेच शोध व बचाव साहित्यांची ओळख आणी त्यास हाताळण्याच्या पद्दती बाबतीत एसडीआरएफ टीम चे प्रमुख एपिआय खोब्रागडे यांचेसह पिएसआय रंदई पिएसआय बंगर आणी त्यांच्या जवानांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण मार्गदर्शन आणी योग्य प्रेझेंटेशन सादर केलेत.