चंद्रपूर : राज्यभरात कधी अवकाळी तर कधी ढगाळ वातावरण सुरू असतानाच शुक्रवारी (दि.24) पूर्व विदर्भ राज्यात सर्वाधिक हॉट ठरला आहे. पूर्व विदर्भातील सगळेच जिल्हे उन्हाने चांगलेच तापले असल्याने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. वाढत्या तापमानाचा त्रास जाणवत लागला असून नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी घराघरात लावलेल्या कुलरचीही थंड हवा गायब झाल्याचे चित्र समोर आले आहे.
शुकवारी (दि.24) पूर्व विदर्भाचा पारा 45.5 अशं सेल्सिअस पोहचला होता. अकोला 45.5 तर चंद्रपूर अमरावती, यवतमाळ आणि वर्धा येथील पारा 43 अंशापार गेल्याने उष्माघाताचा अधिक धोकाही निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांपासून अवकाळी पावसाचे संकट काही थांबलेले नाही. केव्हाही वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरणात कधी गारवा तर कधी प्रचंड उष्णता निर्माण होत आहे. विदर्भात चार दिवसांपासून वातावणात प्रंचड वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पूर्व विदर्भाने उष्ण तापामानात बाजी मारली आहे.
पूर्व विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. अकोल्यामध्ये तापमानात मुसंडी मारली असून पारा 45.5 अंशावर पोहचला आहे. त्यापाठोपाठ यवतमाळ 43.5 तर चंद्रपूर, अमरावती, वर्धा आणि ब्रम्हपुरी मध्ये 43.2 तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. या बरोबरच वाशीम 43.6 तर त्या पाठोपाठ बुलढाण्यातही पारा 42 अंशावर गेला. नागपूर 41.9 गोंदिया 40.4 तर भंडारा 40.2 अंशावर पोहचला आहे. या उष्णतेचा शेतकरी मजूरांनासुद्धा उष्णतेचा फटका बसला आहे.
अकोला, अमरावती व चंद्रपूरला उष्ण लहरीचा धोका
राज्यात अकोल्यामध्ये पारा सर्वात जास्त आहे. शुक्रवारी (दि.24) पारा 45.5 अंशावर तापमान गेल्याने, पुढील पाच दिवस 25 मे ते 29 मे या कालावधीत उष्ण लहरीच्या धोका आहे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी उष्ण लहरीचा निर्माण होणार असल्याचा धोका आहे. यासोबतच अमरावती व चंद्रपूर या जिल्ह्यांना आज आणि उद्या दोन दिवस उष्ण लहरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहून दैनंदिन कामकाज करावे लागणार.