लोकसभा निवडणूक २०२४ चा मतदानाचा आज (दि.२६) दुसरा टप्पा पार पडत आहे. महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या टप्प्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के इतके मतदान झाले आहे. या संदर्भातील वृत्त राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दिली. यापूर्वी शुक्रवारी (दि.१९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला होता. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (दि.२६) महाराष्ट्रासह १३ राज्यात होत आहे. दरम्यान राज्यातील ८ मतदान संघात आज मतदान होत आहे. आज दुपारी वाजेपर्यंत कोणत्या मतदार संघात किती टक्के मतदान झाले आकडेवारी पुढीलप्रमाणे,
राज्यात ‘ या ’ आठ मतदारसंघात आज मतदान
⦁ वर्धा- ४५.९५ टक्के
⦁ अकोला- ४२.६९ टक्के
⦁ अमरावती- ४३.७६ टक्के
⦁ बुलढाणा- ४१.६६ टक्के
⦁ हिंगोली- ४०.५० टक्के
⦁ नांदेड- ४२.४२ टक्के
⦁ परभणी- ४४.४९ टक्के
⦁ यवतमाळ- वाशिम- ४२.५५ टक्के