• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बनावट औषधांना लगाम कधी?

Our Media by Our Media
April 3, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आरोग्य, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, संपादकीय
Reading Time: 1 min read
85 1
0
औषधांवर बंदी
12
SHARES
611
VIEWS
FBWhatsappTelegram

आजारपणात शरीराला तंदुरुस्त करणारे आणि गंभीर स्थितीत रुग्णाला जीवरक्षक ठरणारी औषधे नेहमीच संजीवनी ठरत असतात. तथापि, आरोग्याची जीवनदायिनी ठरणारी औषधे ही नफा कमावण्याचे साधन ठरू लागली, तो एक प्रकारे माणसाच्या जीवाशी खेळच म्हणावा लागेल. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी बनावट औषधी तयार करणार्‍या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला. पोलिसांनी आरोपींकडून कर्करोगावर उपचार करणार्‍या ब्रँडची बनावट औषधे हस्तगत केली. यात सात औषधे परकी कंपन्यांची, तर दोन भारतीय कंपन्यांची होती. आरोपी हे केमोथेरेपीच्या इंजेक्शनमध्ये पन्नास ते शंभर रुपयांचे अँटिफंगल औषध भरत, त्याची एक ते सव्वा लाखांत विक्री करत होते. काही दिवसांपूर्वीच तेलंगणात औषध नियंत्रक प्रशासकांनी खडूच्या पावडरपासून तयार केलेल्या बनावट गोळ्या जप्त केल्या. गाझियाबाद येथे बनावट औषधे तयार करणार्‍या कारखान्यावर छापा टाकला. देशात वेगवेगळ्या ठिकाणी दर्जाहीन आणि भेसळयुक्त औषधांचे साठे पकडल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. एकाच आजारावर उपचार करणार्‍या विविध कंपन्यांच्या औषधांच्या परिणामकतेत फरक असणे चिंताजनक आहे.

बनावट आणि भेसळयुक्त औषध आजाराला लागू पडत नाहीत, त्याचवेळी दुसर्‍या आजाराला निमंत्रण देण्याचे कामही करते. त्याच्या सेवनामुळे यकृत, हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस यावर परिणाम होतो. गुणवत्ता नसलेल्या औषधांची निर्यात केल्याने देशाच्या प्रतिष्ठेला आणि विश्वासाला तडा जातो. नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड करणार्‍या या घटनांनी एका संघटित गुन्हेगारीचे रूप धारण केले आहे. देशात बनावट आणि भेसळयुक्त औषधांना चाप बसविण्यासाठी कायदा अस्तित्वात आहे आणि त्यात दंडाची तरतूद आहे. याशिवाय बनावट औषधांमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार उद्भवल्यास जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. भेसळ किंवा विनापरवाना औषधांची निर्मिती केल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यांतर्गत स्थापन केलेली केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था ही औषधी, सौंदर्यप्रसाधने आणि आरोग्य उपकरणांवर लक्ष ठेवणारी राष्ट्रीय नियामक संस्था आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

भारताचे औषधी महानियंत्रक हे औषधांची निर्मिती, विक्री, आयात आणि वितरणासंबंधी निकष निश्चित करतात. यानुसार राज्यांतील खाद्य आणि औषधी नियामक प्राधिकरणाशी समन्वय साधण्याचेही काम करतात. राज्य पातळीवर औषधी नियंत्रक आणि जिल्हा पातळीवर निरीक्षक हे औषधांची गुणवत्ता निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. गेल्या वर्षी औषधांवर क्यूआर कोड लावण्यास सुरुवात झाली. हा नियम सर्वच औषधांना लागू करायला हवा. परिणामी, औषधांचा काळाबाजार थांंबेल. औषधांची गुणवत्ता निश्चित करणारा ‘फार्माकोविजिलन्स’ कार्यक्रम हा अनेक अर्थांनी उपयुक्त राहू शकतो. यात औषधांच्या दुष्परिणामाचा अभ्यास करून औषध गुणवत्तापूर्ण केले जाते. निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या बाबतीत अधिकाधिक तक्रारी झाल्यास कायद्याचा फास दोषींविरुद्ध अधिक आवळला जाईल.

औषध उद्योगात संशयास्पद गोष्टींना थारा मिळू नये यासाठी केंद्र सरकार तक्रार निवारण प्रणाली अधिक मजबूत करत आहे. काही दिवसांपूर्वी औषधी कंपन्यांसाठी युनिफॉर्म कोड फॉर फार्मास्युटिकल्स मार्केटिंग प्रॅक्टिस (यूसीएमपी), 2024 लागू केले. यानुसार आता औषधी कंपन्यांना संकेतस्थळावर तक्रारीची नोंद करण्यासाठी विंडो ठेवावी लागणार आहे. कंपन्यांना डॉक्टरांना प्रचाराच्या नावाखाली कोणतीही भेटवस्तू देता येणार नाही. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यास तज्ज्ञ म्हणून निमंत्रित केल्या जाणार्‍या डॉक्टरांना येण्या-जाण्याचा तसेच मुक्कामाचा खर्च देता येणार आहे. अशा आयोजनाच्या खर्चाचे विवरण ‘यूसीएमपी’च्या पोर्टलवर द्यावे लागेल. यूसीएमपी कायद्यातील अन्य तरतुदींनुसार एक कंपनी आपल्या वार्षिक विक्रीतील केवळ दोन टक्के मोफत सॅम्पल औषध वितरित करू शकते. भारतीय औषध उद्योग जगभरात विश्वासार्ह उद्योग मानला जातो.

Previous Post

अमरावती : भवानी चौक परिसरात सिलेंडरच्या स्फोटात २ ठार, एक गंभीर

Next Post

भारत पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
१ एप्रिलपासून वस्तू आणि सेवा होणार महाग; वाचा कोणत्या

भारत पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल

जलसाठा

विदर्भाला जलसंकटाची चाहूल!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.