अकोला,दि.30 : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव येथे विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील 23 कंपन्या, उद्योगसमूह, कारखाने यांच्या आस्थापनेवरील सुमारे 1 हजार 227 कुशल, अकुशल रिक्त पदांसाठी रोजगारभरती होणार आहे. या सुवर्ण संधीचा अमरावती विभागातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता उपायुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यात जीनस इन्फ्रा प्रा.लि.,पिपल ट्री व्हेंचर प्रा.लि., ए.जी.एस इंशुरन्स, पेटीएम, जाधव ग्रुप ऑफ कंपनी, लक्ष्मी अग्णी कंपनी प्रा.लि.,सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट सो.ली., नवभारत फर्टीलायझर, टॅलेनसेतू प्रा.लि.,सी.ए.जी.एल, एल.आय.सी., कल्पतरु स्कील डेव्हलपमेंट अकॅडमी, इलेगन्ट कोटींग प्रा.लि.,हेंड मोटर्स एल.एस.पी.प्रा.लि., पीएनबी मेटलाईफ इंडिया इंशुनन्स प्रा.लि., पियाजिओ व्हिकल्स प्रा.लि.बारामती, अलाईड रिसोस मॅनेजमेंन्ट सर्विस प्रा.लि. पुणे, धुत ट्रान्समिशन प्रा.लि.छ.संभाजीनगर, टॅलेंट सेतू, पुणे, परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. छ.संभाजीनगर, पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि.नागपूर आदी 23 नामांकित कंपन्या मार्फत रिक्त पदे भरली जाणार आहेत. या रोजगार मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, इंजिनिअरींग, पदवी, पदव्युत्तर, पदविका तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखती देऊन रोजगाराचा लाभ घेता येईल.
अमरावती विभागातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळावा मधून नोकरी देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्याचाच भाग जागेवरच निवड मोहीमेच्या (ऑन स्पॉट सिलेक्शन) माध्यमातून विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी मिळेल.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी (प्लेसमेंट ड्राईव्ह) http://surl.li/mbrkg या लिंकवर जाऊन नि:शुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळाला भेट देवून नि:शुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. इच्छुक उमेदवारांनी 2 फेब्रुवारीला संत गजानन महाराज अंभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव जि. बुलडाणा येथे स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांसह (ऑनलाईन सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती, दोन पासपोर्ट फोटो, बायोडाटा व इतर आवश्यक साहित्यासह) रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.