अकोला,दि.23 : मतदार नोंदणीसाठी शिबिरे व विविध प्रयत्नांमुळे पुरूष मतदारांबरोबरच महिला मतदारांच्या संख्येत भर पडली आहे. महिला मतदारांची संख्याही वाढली असून, लिंग गुणोत्तरात 8 गुणांकांची वाढ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिली. नियोजनभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यात दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी 2023 रोजी प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात पुरुष मतदार संख्या 7 लाख 94 हजार 752 इतकी होती. दि. 23 जानेवारी 2024 रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीतील पुरुष मतदार संख्या 8 लाख 5 हजार 986 इतकी आहे. स्त्री मतदारांची प्रारूप मतदार यादीमधील संख्या 7 लाख 39 हजार 190 होती. ती अंतिम यादीनुसार 7 लाख 56 हजार 35 पर्यंत पोहोचली आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे 930 स्त्रिया होत्या. हे प्रमाण अंतिम मतदार यादीत एक हजार पुरुषांच्या मागे 938 स्त्रिया असे झाले आहे. तृतीयपंथी समुदायाची 23 जानेवारी 2024 मधील संख्या 49 इतकी आहेत.
प्रारुप मतदार यादीतील मतदार :
1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील दि. 27/10/2023 रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात आली होती. या यादीत खालीलप्रमाणे मतदार संख्या होती.
अ.क्र. | मतदार संघ क्रमांक व नांव | दिनांक 27/10/2023 रोजी प्रसिध्द
प्रारुप मतदार यादीनुसार मतदार संख्या |
|||
पुरुष | स्त्री | इतर | एकूण | ||
1 | 28-अकोट | 153594 | 138048 | 4 | 291646 |
2 | 29-बाळापुर | 151132 | 138638 | 6 | 289776 |
3 | 30-अकोला (पश्चिम) | 165704 | 160458 | 20 | 326182 |
4 | 31-अकोला (पुर्व) | 172225 | 161613 | 15 | 333853 |
5 | 32-मुर्तिजापुर (अ.जा.) | 152097 | 140433 | 6 | 292536 |
एकूण…. | 794752 | 739190 | 51 | 1533993 |
दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत प्राप्त अर्ज :
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 7 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये झालेली मतदार नोंदणी, वगळणी व दुरुस्तींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
अ. क्र. | मतदार संघ क्रमांक व नांव | प्राप्त अर्ज संख्या | स्विकृत अर्ज संख्या | ||||
नमुना 6 | नमुना 7 | नमुना 8 | नमुना 6 | नमुना 7 | नमुना 8 | ||
1 | 28-अकोट | 12512 | 4951 | 2979 | 13219 | 5836 | 2800 |
2 | 29-बाळापुर | 15092 | 6298 | 3200 | 12421 | 3954 | 3008 |
3 | 30-अकोला (पश्चिम) | 12781 | 10325 | 3168 | 11657 | 9763 | 2978 |
4 | 31-अकोला (पुर्व) | 12317 | 7473 | 2519 | 11936 | 7245 | 2368 |
5 | 32-मुर्तिजापुर (अ.जा.) | 14008 | 8208 | 3837 | 13717 | 8075 | 3607 |
एकूण | 66710 | 37255 | 15703 | 62950 | 34873 | 14761 |
अंतिम मतदार यादीतील मतदार :
वरीलप्रमाणे नोंदणी, वगळणी व दुरुस्ती पश्चात दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार मतदार संख्या खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | मतदार संघ क्रमांक व नांव | दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिध्द
अंतिम मतदार यादीनुसार मतदार संख्या |
|||
पुरुष | स्त्री | इतर | एकूण | ||
1 | 28-अकोट | 156818 | 142208 | 3 | 299029 |
2 | 29-बाळापूर | 154843 | 143396 | 4 | 298243 |
3 | 30-अकोला (पश्चिम) | 165843 | 162212 | 21 | 328076 |
4 | 31-अकोला (पुर्व) | 174008 | 164521 | 15 | 338544 |
5 | 32-मुर्तिजापूर (अ.जा.) | 154474 | 143698 | 6 | 298178 |
एकूण | 805986 | 756035 | 49 | 1562070 |
प्रारुप मतदार यादी व अंतिम मतदार यादी याची तुलना केली असता दिनांक 27/10/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादी मध्ये एकूण 15,33,993 (पंधरा लाख तेहत्तीस हजार नऊशे त्र्यांनव) मतदारांचा समावेश होता. त्यानंतर दावे व हरकती सादर करावयाच्या कालावधीमध्ये मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादी मध्ये मतदार संख्या ही 15,62,070 (पंधरा लाख बासष्ट हजार सत्तर) एवढी आहे यामध्ये 62,950 (बासष्ट हजार नऊशे पन्नास) इतकी नवीन मतदार नोंदणी आहे, तर 34,873 (चौतीस हजार आठशे त्र्याहत्तर) एवढ्या दुबार, मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारुप मतदार यादीच्या तुलनेत मतदार संख्येमध्ये एकूण 28,077 इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.
18-19 वयोगटातील मतदार :
सदर पुनरिक्षण कार्यक्रम व विशेष मोहिमेअंतर्गत वय वर्षे 18 ते 19 वयोगटांतील पात्र मतदारांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करुन शाळा, महाविद्यालये, युवा महोत्सव, सार्वजनिक ठिकाणी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत घरोघरी भेटी देऊन तसेच मतदान केंद्रांवर मतदार नांव नोंदणीचे कार्यक्रम राबविण्यात येऊन तरुण व पात्र मतदारांचे अर्ज गोळा करण्यात आले. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांची बैठक घेण्यात येऊन महाविद्यालयामध्ये मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले व जिल्हयातील युवक–युवती यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहीत करण्यात आले. जिल्ह़्यातील प्रमुख महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला तसेच त्यांना मतदार नाव नोंदणीचे महत्त्व पटवून देत त्यांचे व त्यांच्या परीवारातील सर्व सदस्यांची नांवे मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत प्रेरीत केले. वय वर्षे 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या ही दिनांक 27/10/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार 4012 (0.26%) इतकी होती. वरील प्रयत्नांमुळे सदर संख्येमध्ये 16,621 इतक्या मतदारांची भर पडून दिनांक 23/01/2024 रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये सदर मतदार संख्या ही 20,633 (1.41%) इतकी झाली आहे.
(PSEs- एकसारखे फोटो असलेले मतदार) व Demographic Similar Entries (DSEs- मतदार यादीत नांव व इतर काही तपशिल समान असलेले मतदार) :
अकोला जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये असलेल्या Photo Similar Entries (PSEs- एकसारखे फोटो असलेले मतदार) व Demographic Similar Entries (DSEs- मतदार यादीत नांव व इतर काही तपशिल समान असलेले मतदार) यांची सखोल तपासणी करुन एकूण 8914 मतदारांची वगळणी करण्यात आली. हि वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.
भटक्या व विमुक्त जमातीतील मतदारांबाबत :
तसेच जिल्ह्यातील दुर्गम भागातील गांव, वस्त््या, पाडे याठिकाणी संबंधीत तलाठी यांचेमार्फत प्रत्यक्ष भेटी देऊन भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी पात्र व्यक्तींना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन पात्र व्यक्तींकडून मतदार नाव नोंदणीबाबतचे अर्ज भरुन घेण्यात आले. तसेच शासनाकडून पुरविण्यात येणा-या विविध सुविधा, दाखले, रेशन कार्ड इत्यादी त्यांना उपलब्ध करुन देण्यात आले. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-
अ. क्र. | जिल्हा | लाभार्थ्यांची संख्या | प्रत्यक्ष शिबिरात दिलेले लाभ | ||||
मतदार ओळखपत्र | आधार कार्ड | रेशन कार्ड | जात प्रमाणपत्र | इतर लाभ / दस्ताऐवज | |||
1 | अकोला | 659 | 358 | 147 | 83 | 59 | 65 |
मतदार नोंदणीकरीता केलेले विशेष प्रयत्न :
महानगरपालीका, नगरपरिषद, नगरपालीका, ग्रामपंचायत यांचे मार्फत फिरणा-या कचरा गाड्यांव्दारे ध्वनीफितीव्दारे, Digital Display असलेल्या वाहनांव्दारे तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार बाळापुर यांनी तयार केलेल्या “जागा हो… जागा हो… मतदार राजा जागा हो…” या व्हिडीओ गीता मार्फत जिल्ह्यातील मतदारांना प्रभावीत करुन मतदार जनजागृती तसेच मतदारांना मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करणेकरीता प्रवृत्त करण्यात आले. तसेच मतदार जनजागृतीरथाव्दारे प्रत्येक मतदार संघामध्ये स्थानिक बोलीभोषेतील ध्वनीफित व्दारे व डिजीटल फ्लेक्स लावून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरी भाग अधिक असलेल्या विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या आढावा बैठका घेऊन मतदार यादी शुध्दीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखीत केले. त्याचप्रमाणे अधिक तत्परतेने कामकाज करण्यासाठी प्रवृत्त केले. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, कावड यात्रा इत्यादी ठिकाणी मतदार नाव नोंदणीबाबतचे स्टॉल लावून त्याठिकाणी अर्ज भरुन घेण्यात आले. जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, कर वसुली लिपीक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील पात्र मतदारांकडून मतदार नांव नोंदणीबाबतचे अर्ज भरुन घेण्यात आले.
मतदार यादीतील महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्याचे दृष्टीने अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, सामाजिक संस्था इत्यादींचे मार्फत घरोघरी भेटी देऊन पात्र महिला, लग्न होऊन आलेल्या महिला यांचा शोध घेऊन त्यांचेकडून मतदार नाव नोंदणीचे अर्ज भरुन घेण्यात आले. दुबार, मयत, स्थलांतरीत मतदारांच्या नावाची वगळणी करण्याचे अनुषंगाने महानगरपालीका, नगर परिषद, नगरपालीका, संबंधीत ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांचेकडील जन्म मृत्यू नोंदवहीच्या आधारे मयत मतदारांच्या नावाचा शोध घेऊन त्यांचे कुटूंबातील व्यक्तींकडून मतदार यादीतून नांव वगळणीबाबतचे नमुना 7 चे अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी/कर्मचारी व त्यांचे कुटूंबासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. त्याअंतर्गत मतदार नांव नोंदणीबाबतचे नमुना 6 चे अर्ज, मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधीचे नमुना 8 मधील अर्ज भरुन घेण्यात आले. दिनाक 23 जानेवारी रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर (https://electoralsearch eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी नमुना 6 भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांनी केले आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updataion) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना आणि पात्र व्यक्तींना मतदार नोदणीची अजूनही संधी आहे.
राष्ट्रीय मतदार दिवस :
मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार संपुर्ण भारतात दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा स्तरावर राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे अनुषंगाने सकाळी 8 वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटीका चौक ते मुख्य बस स्टॅंड चौक ते पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अशी शालेय विद्यार्थ्यांची पायदळ रॅली जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे विविध स्पर्धा व लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याबाबत सामुहीक शपथ ग्रहण इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शपथ जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये घेण्याबाबत या कार्यालयाकडून परिपत्रक देखील निर्गमीत करण्यात आलेले आहे.