जी गॅरंटी मोदी सरकारने दिली तीच गॅरंटी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. आमच्यासाठी लोकार्पण, शिलान्यास हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो. आम्ही लोकांसाठी काम करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी केले. ते अटल सेतूच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, ‘मागील अनेक दिवसांपासून या अटल सेतूची चर्चा होत आहे. आता या अटल सेतूची विशालता पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत. हा सागरी सेतू बनवण्यासाठी जपानने जे सहकार्य केले त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मागच्या 10 वर्षात भारत बदलला आहे याची चर्चा होत आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. आता प्रकल्पांची चर्चा होते. 2014 च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी काही संकल्प मी केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना मी पाहतोय.’
अटल सेतू हा वांद्रे वरळी सी लिंकपेक्षा जास्तपटीने आधुनिक आहे. तेव्हाच्या सरकारला हा सेतू बनवण्यासाठी 10 वर्ष लागली होती. पण काहीच वर्षात अटल सेतू मुंबईकरांच्या सेवेत आलाय. ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देशावर राज्य केले, त्यांची नियत चांगील नव्हती. त्यामुळे त्यांना देशात विकास करता आला नाही. मेगा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आमचे सरकार कुठेही कमी पडत नाही. देशात अनेक एक्स्प्रेस वे तयार होत आहेत. महाराष्ट्रात 8 हजार कोटींचे प्रकल्प राबवले जात आहेत. आज मोदी गॅरंटी ही देशातल्या घराघरात पोहचली आहे. जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात, तिथे मोदींची गॅरंटी सुरु होते, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला, असा टोलाही पीएम मोदी यांनी विरोधकांना लगावला.