• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, May 6, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ’ अभियान

Our Media by Our Media
January 1, 2024
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, शिक्षण
Reading Time: 1 min read
98 1
0
जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ अभियान प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
14
SHARES
709
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१ : शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना सहभागी करून घ्यावे, तसेच अधिकाधिक लोकसहभाग मिळवून हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, शिक्षणाधिकारी सुचेता पाटकर व सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

लोकसहभाग मिळवा

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, शाळांतील पायाभूत सोयी सुविधांत वाढ, शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती, तसेच आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांबाबत उपक्रमांसाठी शाळांना प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळा सहभागी असतील. मुंबई महापालिका, वर्ग-अ आणि वर्ग-ब महानगरपालिका शाळा, उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरांवर हे अभियान राबविण्यात असून, जिल्ह्यातील सर्व शाळांना अभियानात सहभागी करून घ्यावे. शिक्षणाबाबत आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्मितीसाठी, तसेच शाळांचे सौंदर्यीकरण, स्वच्छता, गुणवत्ता वाढविण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आदी लोकसहभाग मिळवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

भरघोस बक्षीसे

या अभियानातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन मिळणार आहे. अभियानात विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी एकूण १०० गुण असतील. मुंबई महापालिका क्षेत्रातील तसेच अ व ब वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले पारितोषिक २१ लाख, दुसरे पारितोषिक ११ लाख, तिसरे पारितोषिक ७ लाख रुपये आहे.

त्याचप्रमाणे, उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांनादेखील विभागस्तरावर २१ लाख, ११ लाख व ७ लाख अशी तीन बक्षीसे, जिल्हास्तरावर ११ लाख, ५ लाख व ३ लाख, त्याचप्रमाणे तालुका स्तरावर ३, २ व १ लाख रू. अशी तीन बक्षीसे मिळतील. राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखांचे असून दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाखांचे असेल. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

Previous Post

MPSC च्या उमेदवारांसाठी मोठी बातमी! राज्यसेवा २०२४ पदभरती जाहीर, २७४ पदांसाठी

Next Post

दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘ शॉप ऑन ई- व्हेईकल योजना ’

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘ शॉप ऑन ई- व्हेईकल योजना ’

दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘ शॉप ऑन ई- व्हेईकल योजना ’

शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री योजना

शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री योजना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.