अकोला, दि. २८ : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा दि. २० जानेवारी रोजी जिल्ह्यात २५ केंद्रांवर होणार असून, एकूण ७ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षार्थ्यांनी https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard या संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रे प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर युजरनेम म्हणून वापरावा. स्वत:ची जन्मतारीख हा पासवर्ड आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी द्विप्रतीत स्वाक्षांकित करून घ्यावे. त्यातील एक प्रत परीक्षा पर्यवेक्षकाला द्यावी लागणार आहे, असे कळविण्यात आले आहे.