पिंपरी : मुलांच्या हातात सध्या मोबाईल खूप सहजपणे आला आहे. या मोबाईलचा वापर मुलांकडून जास्त प्रमाणात गेम खेळण्यासाठी केला जात आहे. मुले आणि तरुणांकडून सायबर कॅफेमध्ये देखील पॉकेटमनी खर्च करुन गेम खेळण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे मुलांना गेमिंगचे वेध लागले असून त्याचे व्यसन जडत चालले आहे. ही बाब अतिशय धोकादायक असून शहरामध्ये या आजाराचे दरमहा दहा ते पंधरा रुग्ण आढऴून येत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.
गेमिंगचे लागते वेड
मोबाईलवर गेम खेळताना काही गेमसाठी सबस्क्रिब्शन घ्यावे लागते. तर, काही गेम या विनामूल्य उपलब्ध असतात. मुलांकडून मोफत गेम खेळण्यासाठी प्राधान्य दिले जाते. गेम खेळताना त्यांना लेव्हल पुर्ण करण्याचे वेध लागते. लेव्हल पुर्ण न झाल्यास आणि मध्येच पालकांनी मोबाईल घेतल्यास मुले चिडचिड करु लागतात. त्यांना राग येतो. नैराश्याची भावना निर्माण होते.
गेमिंग डिसऑर्डरमध्ये नेमके काय होते ?
तणाव कमी करण्यासाठी तसेच वेळ घालविण्यासाठी मुले विविध प्रकारच्या ऑनलाइन गेम खेळण्यात मग्न होतात. त्याचदरम्यान आपल्याला कोणते काम करायचे आहे, हे देखील त्यांच्या लक्षात येत नाही. त्यावेळी त्यांच्यात विसरभोळेपणा निर्माण होतो.
आजाराची लक्षणे
- तासनतास गेम खेळणे स्वतःवर नियंत्रण
- नसणे अन्य कामांपेक्षा गेम खेळण्यास
- महत्व देणे अभ्यासात मन न लागणे
- गेमच्या आहारी जाऊन वेळेत जेवण न करणे
अशी घ्या काळजी…
- पालकांनी मुलांना वेळेचे नियोजन करुनच मोबाईल हाताळण्यास द्यावा.
- मुलांचा स्क्रीनटाईम कसा कमी होईल, याचे नियोजन करावे.
- मुले अनुकरण करत असल्याने पालकांनी देखील मोबाईलचा कमी वापर करावा.
- मुलांशी व्यक्तिगत संवाद साधावा.
- मुलांनी मोबाईलचा वापर किती करावा, याचे स्वयंनियंत्रण पालकांनी शिकवावे.