अकोला,दि.१६ : वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व व्यक्तींनी दि. ९ डिसेंबरपूर्वी मतदार नोंदणीचा अर्ज भरून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हााधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. भारत निवडणुक आयोग व मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित नविन मतदार नोंदणी कार्यक्रम 9 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्याअनुषंगाने नवमतदार, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी,विमुक्त जाती जमाती व भटक्या जमाती व इतर घटकांची मतदार नोंदणी मोठया प्रमाणात करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
उपजिल्हा निवडणुक अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून अकोला पूर्व मतदारसंघात मतदार रथ ठिकठिकाणी जनजागृती करत आहे.
अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांनी आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा वोटर हेल्प्लाईन अँपद्वारे
किंवा https://voters.eci.gov.in/ या वेबसाईटद्वारे सादर करावा.
मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार अकोला यांचे कार्यालयातही अर्ज सादर करता येईल.