• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालकमंत्र्यांकडून विविध विभागांचा आढावा

Our Media by Our Media
October 16, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
92 1
0
आ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील
13
SHARES
666
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१६ : नियोजित कामांना वेग देण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्पर होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील विकासकामांची गरज व पुढील काळात विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करावे, असे निर्देश राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागप्रमुखांची सभा नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जि. प. संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. पोलीस अधिक्षक संदीप घुगे आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रत्येक विभागाने आवश्यक विकासकामे व विकासप्रक्रियेला दिशा देण्यासाठी येत्या काळात अपेक्षित बदलांचा वेध घेऊन सादरीकरण तयार करावे. पुढील वेळी त्याचा आढावा घेतला जाईल.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

ते पुढे म्हणाले की, अकोट तालुक्यात व इतर तालुक्यांतही  वर्गखोल्या शिकस्त असल्याने पाडण्यात आल्या. त्यावेळी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कक्ष नाहीत. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. मनरेगा, जिल्हा नियोजन निधी आदींतुन कालमर्यादित कार्यक्रम निश्चित करून हे काम गतीने पूर्ण करावे. जिल्ह्यात दुग्धोत्पादन विकासासाठी मुरघास, वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद क्षेत्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी प्रस्ताव द्यावा. जलयुक्त शिवार योजना टप्पा २ मध्ये १ हजार ६७४ कामे नियोजित आहेत. यापूर्वीच्या कामांतील गेटचे काम पूर्ण करून घ्यावे. वाढीव निधीची गरज असल्यास प्रस्ताव द्यावा.

जलजीवन मिशनमध्ये जीवन प्राधिकरण व जि. प. कडून सुरू असलेल्या कामांची सद्य:स्थिती, खर्च, नकाशे, झालेली कामे आदी  माहिती देणारे फलक पुढील १५ दिवसांत लावावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य, शिक्षण, वने, आदिवासी विकास आदी विविध विभागांचा आढावा त्यांनी घेतला.

Previous Post

भारताची धुवाधार सुरूवात, सातव्या षटकातच ५० धावा पुर्ण

Next Post

राहुल बोरकर यांची अखिल भारतीय संत समिती जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
राहुल बोरकर यांची अखिल भारतीय संत समिती जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

राहुल बोरकर यांची अखिल भारतीय संत समिती जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

Radhakrishna Vikhe-Patil

नवे शासकीय रूग्णालय सर्व सुविधायुक्त होण्यासाठी परिपूर्ण आराखडा करा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.