• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

श्वान पाळणा-यांनी श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून घ्यावे

Our Media by Our Media
September 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
91 1
0
रेबिज
13
SHARES
657
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.28 : रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी 36 टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. भारतात 95 टक्के प्रकरणात माणसांना रेबीज होण्यामागे कुत्रा कारणीभूत आहे. त्यामुळे कुत्रा पाळणा-या कुटुंबांनी श्वानांमधील अँटी रेबीज लसीकरण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी आज येथे केले.

जागतिक रेबीज दिवसानिमित्त माहिती देताना ते म्हणाले की, रेबीज पशुसंक्रमित मानवी आजार असून जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. जगभरात दरवर्षी 59 हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात 95 टक्के प्रकरणात कुत्र्यामुळे, 2 टक्के प्रकरणात मांजर आणि 1 टक्के प्रकरणात कोल्हा किंवा मूंगूसामुळे रेबीज पसरतो. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी श्वानांमधील अँटी रेबीज लसीकरण प्रभावीरीत्या मोहिम स्वरुपात राबविणे आवश्यक आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

रेबीज हा रोग उष्णरक्त वर्गीय प्राण्यामध्ये दिसून येणारा घातक विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचे विषाणू पशुधनाच्या मज्जासंस्थेस बाधित करतात. मज्जासंस्थेचे दाट जाळे असणा-या भागातील स्त्रावातून हे विषाणू शरीरातून बाहेर पडतात. पशुधनाच्या चावण्याने (दंश) या विषाणूचा प्रामुख्याने प्रसार होतो.

श्वानदंश (रेबीज) रोगाविषयी संक्षिप्त माहिती  खालील प्रमाणे आहे

  • संशयास्पद श्वानदंश  आजारी पशुधनाबाबत श्वान दंश झाल्याचा किंवा पिसाळलेला भटका कुत्रा परिसरात आल्याचा पूर्व इतिहास असणे आवश्यक आहे.
  • बाधित पशुधनास रेबीज झाल्याचा संशय बळावत असेल तर अशा पशुधनास हाताळू नये.
  • अशा बाधित पशुधनास उपचार करणे निरुपयोगी ठरते.
  • संशयास्पद / बाधित पशुधनाचे विलगीकरण करावे.
  • अशा पशुधनांचा उरलेला चारा पिण्याचे पाणी भांडी शेड व परिसराचे निर्जंतुकीकरण करा (कार्बोलिक ऍसिड, सोप सोल्युशन अथवा डीटर्जेंट च्या द्रावणाने ).
  • अशा पशुधनास हाताळताना ग्लोव्ज वापरावे सर्व वापरलेली प्रावणे जाळून नष्ट करावीत.
  • बाधीत पशुधन मृत झाल्यास शवविच्छेदन करीत असतांना व्यक्तिगत जैवसुरक्षा साधणे जसे पीपीई कीट ग्लोज मास्क फेसशिल्ड वापरावा शवविच्छेदनानंतर सर्व प्रावणे जाळून टाकावी.
  • शवविच्छेदनानंतर मृत शरीराची शात्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी जेणे करून वन्य प्राणी व मांसभक्षक  प्राणी सदर बाधीत पशुधनाच्या संपर्कात येऊन  रोग संक्रमित होणार नाहीत व या रोगाचा प्रसार होणार नाही.

श्वानदंश झाल्याचे निदर्शनास आल्या नंतर करावयाच्या उपाय योजना

  • मज्जा संस्थेसंबंधी लक्षणे दिसून आल्यास अशा पशुधनातील उपचार काळजीपूर्वक व संरक्षक प्रावणे (पीपीई फीट, ग्लोब्ज, मास्क, फेसशिल्ड )करावेत.
  • बाधीत पशुधन चावल्यास / लाळेशी संपर्क आल्यास साबणाच्या द्रावणाने किंवा डिटर्जंटच्या द्रावणाने जखम धुवुन काढावी जखमेवर २ टक्के एक्वियस क्वाटरनरी अमोनियम कंपाऊंड लावावे. त्यानंतर टीक्चर आयोडीन, पोव्हीडोन आयोडीन लावावे. जखमेस पट्टी बांधू नये.

प्रतिबंधक लसिकरण

श्वानदंश / रेबीज प्रतिबंधासाठी दोन प्रकारे लसिकरण करण्यात येते .

  • श्वानदंशापुर्वी  २ श्वानदंशानंतर

श्वानदंशापुर्वी करावयाच्या लसीकरण पध्दती

  • प्राथमिक लसिकरण सर्व साधारणतः प्रति बंधात्मक लसीची ३ इंजेक्शने शुन्य दिवस ७ वा दिवस आणि २१/२८ वा दिवस
  • बुस्टर लसीकरण प्राथमिक लशीकरणानंतर १ वर्षाने
  • तथापि लस उत्पादकांच्या सूचनांनुसार लशीकरण वेळापत्रक  व लस मंत्राची संख्या याचे तंतोतंत पालन करावे.

श्वानदंशानंतर करावयाच्या लसीकरण पध्दती

  • श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण न केलेले पशुधन तसेच  प्रतिबंधात्मक लासिकरानानंतर प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधी उलटून गेला असेल अशा पशुधनाची लसीची ५ इंजेक्शन द्यावीत .
  • वेळापत्रक शुन्य दिवस. ३ रा दिवस ७ वा दिवस १४ आणि २८ दिवस
  • श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले व प्रतिबंधात्मक संरक्षण कालावधीत श्वानदंश झालेला असल्यास अशा पशुधनास  फक्त लसीची २ च  इंजेक्शने घ्यावी लागतात त्या लसीकरणाचे वेळापत्रक ज्या दिवशी पहिली लस घेतली तो   शुन्य दिवस असून त्या नंतर ३ दिवसाने दुसरी लस घेण्यात यावी.
  • आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपल्या कुत्र्यांचे श्वानदंश प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे असे आवाहन  डॉ .जगदीश बुकतारे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे .
Previous Post

भारतीय तरुणांची हृदये होत आहे कमकुवत

Next Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शिवार फेरी’ चा शुभारंभ

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'शिवार फेरी' चा शुभारंभ

LPG cylinder

एलपीजी' चे सिलिंडर महागले, जाणून घ्‍या नवे दर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.