अकोला,दि.26: अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांच्या मदतीसाठीचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय महसूल विभागाने सोमवारी निर्गमित केला.
विविध जिल्ह्यांत मार्च, एप्रिल व मे या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसाने शेतीपिकांचे नुकसान झाले. शेतीपिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास 2 हेक्टर मर्यादेत निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते. त्यानुसार अकोला जिल्ह्यात मार्च- एप्रिल या कालावधीतील अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी मदत निधी देण्यात येणार आहे. त्यानुसार 430.12 हे. बाधित क्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील 595 नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना एकूण 78.35 लक्ष रू. वितरित करण्यात येणार आहे.