• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा उपक्रम

Our Media by Our Media
September 15, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
102 1
0
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियान अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचा उपक्रम
15
SHARES
736
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 15: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी इच्छूक युवकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे आतापर्यंत जिल्ह्यातील 261 लाभार्थ्यांना एकूण 16 कोटी 96 लाख 83 हजार 913 रू. कर्जवाटप करण्यात आले असून, त्यांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी मदत झाली आहे.

महामंडळातर्फे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात युवक-युवतींना व्यवसायासाठी सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळाकडून केला जातो. त्यामुळे व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मदत मिळते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

आतापर्यंत या योजनेत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून विविध युवकांनी घेतलेल्या कर्जावर 1 कोटी 63 लाख 82 हजार 690 रू. रकमेचा व्याज परतावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, चालू वर्षात अकोला जिल्ह्यात 37 लाभार्थ्यांना 3 कोटी 18 लक्ष 20 हजार 829 रू. इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रोहित पाटील यांनी दिली.

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे राबविण्यात आलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे.या कर्जाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसाय, दुग्ध व्यवसाय,शेळीपालन, मेडिकल, कृषी सेवा केंद्र,हॉटेल, मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर, किराणा दुकान, फुटवेअर, टेलरिंग दूकान असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळते.

Previous Post

नागपुरात संततधार विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Next Post

वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी

वैद्यकीय महाविद्यालयाला कार्डियाक रुग्णवाहिकेची देणगी

सिराज, हार्दिक, बुमराहने केले ‘लंकादहन’

सिराज, हार्दिक, बुमराहने केले ‘लंकादहन’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.