• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासन आपल्या दारी : एका क्लिकवर लाखभर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य

Our Media by Our Media
September 5, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
87 1
0
विशेष लेखः- ‘शासन आपल्या दारी’ विविध दाखले, योजनांचे लाभ…एकाच ठिकाणी
13
SHARES
631
VIEWS
FBWhatsappTelegram

बुलडाण्यात रविवारी झालेला ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक लाखाहून अधिक लाभार्थ्यांना मदतीचे वाटप केले. यात 30 हजार ऑफलाईन, तर 75 हजार लाभार्थ्यांना ऑनलाईन मदतीचे वाटप करण्यात आले. एका क्लिकवर लाखभर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

महसूल विभागातील नैसर्गिक आपत्ती पिक नुकसानीसाठी 71 हजार 545 लाभार्थ्यांपैकी 51 हजार 738 लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. यात डिसेंबर 2021 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या खामगाव तालुक्यातील उर्वरीत 224 लाभार्थी, ऑक्टोबर 2021 मधील मेहकर तालुक्यातील 7 हजार 641 लाभार्थी, जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 66 हजार 931 लाभार्थ्यांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आले. तसेच येत्या काळात 62 हजार 854 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. तसेच एप्रिल 2023 मध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या 826 लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात आले. याच कार्यक्रमात 12 हजार एपीएल कार्डधारकांना डीबीटीद्वारे 54 लाख रूपयांचा लाभ देण्यात आला. तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, 15 हजार 936 विविध प्रकारचे दाखले आणि एकाला अनुकंपा तत्वावर तलाठी पदावर नियुक्ती पत्र देण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाह, महिला बाल कल्याण विभागातर्फे महिला सक्षमीकरणासाठी पिठाची गिरणी, शिलाई मशिन, प्रादेशिक मोटार परिवहन विभागातर्फे दिव्यांग व्यक्तीला वाहन करातून सूट ही मदत देण्यात आली. कार्यक्रमात विविध योजनांचा लाभ देण्यात आला. प्रातिनिधीक स्वरुपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभाचे वितरण करण्यात आले.

कृषी विभागातर्फे अपघातग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदानातून दहा लाख रूपयांचा विमा संरक्षण निधी देण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरत आहे. यात 195 लाभार्थ्यांना 1 कोटी 28 लाख 47 हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील 1 हजार 192 लाभार्थींना 5 कोटी 41 लाख 27 हजार रूपये देण्यात आले. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत 3 हजार 134 लाभार्थ्याना 3 कोटी 24 लाख रूपयांचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) अंतर्गत 1 कोटी 64 लाख 78 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आले. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास योजना, शेतकरी उत्पादक कंपनीला फवारणीसाठी चार लाख रुपयांचे ड्रोन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयक्तीक शेततळे योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. शेतकऱ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमातून भक्कम मदत देण्यात आली. यातून कृषि क्षेत्राचा विकास होण्यास मदत मिळणार आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतून पीएमएफई, एमकेएपीपीजी फंड, सीआयएफ बी लिंकेज, आदिवासी विकास विभाग, कामगार विभाग विभागातर्फे शैक्षणिक कल्याण, सामाजिक कल्याण, सुरक्षा संच, जिल्हा उद्योग केंद्राकडून उद्योगासाठी अर्थसहाय्य, नगर परिषद बुलडाणातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानात 25 लाख 50 हजार रूपयांचे वाटप करण्यात येणार आले. तसेच पीएम स्वनिधीचे वाटप करण्यात आले.

बुलडाणा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातर्फे श्री शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारार्थीं आणि खेळाडूंना आधुनिक खेळ साहित्य, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे पीएमएफएमई, मुद्रा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र या 31 लाभार्थ्यांना 4 कोटी 17 लाख 14 हजार रूपये वाटप करण्यात येणार आले.

शासन आपल्या दारी कार्यक्रमातून कृषी, उद्योग, क्रिडा, रोजगार, महिला सक्षमीकरण, समाज कल्याण अशा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लाभ देण्यात आला. हे लाभ प्रतिनिधिक असले तरी येत्या काळात शासनाच्या योजना लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाण्यास मदत मिळाली आहे.

Previous Post

कब्रस्थानला योग्य रस्ताच नाही मुस्लिम समाजाचा आवाज ऐकणार की नाही! मागणी पूर्ण न झाल्याने धरणे आंदोलन

Next Post

सणांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सणांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवा

सणांच्या काळात सुव्यवस्था राखण्यासाठी काटेकोर नियंत्रण ठेवा

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.