तेल्हारा(प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाला अंत्यविधी करण्यासाठी शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कब्रस्थान येथे जाण्याकरिता सुविधा मिळाव्या यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिले, शासन प्रशासनाला सत्ताधारी यांच्याकडे मागणी सुद्धा केली मात्र अद्याप ती पूर्ण केली नाही. तेल्हारा नगर पालिकेत अनेक सत्ता आली आणि गेली मात्र मुस्लिम कब्रस्थान च्या रस्त्याची बिकट परिस्थिती,पाण्याची सुविधा लाईट व्यवस्था कोणी सोडू शकले नाही. या अगोदर अनेक वर्षांपासून मागणी केली होती मात्र गेल्या दहा दिवसांअगोदर एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती की आठ दिवसाच्या आत रस्त्याबाबत पाऊले उचलल्या गेली नाही तर आंदोलन छेडण्यात येईल आज मुस्लिम कब्रस्थान संघर्ष समिती कडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. धरणे आंदोलनाला अनेक राजकीय पक्ष सामाजिक राजकीय संघटना यांनी पाठींबा दर्शविला असून न प प्रशासन कुठले पाऊल उचलणार आणि ही समस्या सोडवणार की अशीच कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
याबाबत एक समिती स्थापन करून माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनात ही मागणी आम्ही करू आणि मुस्लिम समाजाची कब्रस्थान याबद्दल असलेली सर्व समस्या नक्की मार्गी लावू. सतीश गावंडे मुख्याधिकारी न पा तेल्हारा आमची मागणी पूर्ण न झाल्याने समिती कडून धरणे आंदोलन करण्यात आले आज मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिले की जिल्हाधिकारी यांच्या कडे योग्य त्या मागणी संदर्भात पाठपुरावा केला असून येत्या काळात रस्ता पूर्णत्वात येईल.
मतीन शहा (समिती सदस्य)