गेल्या 10 वर्षांपासून ज्या खातेदारांनी बँकेत आपल्या जमा रक्कमेबाबत कोणतीच विचारपूस अथवा कोणतीच माहिती घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. अशा खातेदारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे 35000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली आहे, ज्याला कोणीच दावेदार नाही. ही मोठी रक्कम अनेक वर्षांपासून अघोषित बँक ठेवी म्हणून विसरली आहे आणि लोकांना त्यांची विसरलेली रक्कम मिळवून देण्यासाठी, भारताचे मध्यवर्ती बँक, भारतीय रिझर्व बँक ने UDGAM (अघोषित ठेवी: माहिती प्रवेश गेटवे) केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे.
सुरक्षेच्या कारणांमुळे लोक आपल्या कष्टाचे पैसे बँकांमध्ये जमा करतात. बँकांच्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालू राहतात असा ठाम विश्वास खातेदाराला असतो. पण सध्या एक माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये असे अनेक खातेदार आहेत ज्यांनी बँकेत पैसे भरले पण ते बँक व्यवहारांपासून लांबच राहिले आहेत. पैसे भरून देखील ते हे विसरुन गेले आहेत की आपले पैसे बँकेत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून या खातेदारांनी बँकेत आपल्या जमा रक्कमेबाबत कोणतीच विचारपूस अथवा कोणतीच माहिती घेण्याचा प्रयत्नही केलेला नाही. अशा खातेदारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे 10.24 कोटी खाती अशी होती ज्यामध्ये फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण 35,012 कोटी रुपये जमा आहेत. हे खातेधारक गेल्या 10 वर्षांपासून बँकेमध्ये आपले पैसे असल्याचे विसरून गेले आहेत. त्यामुळे या खात्यांमधील रक्कमेला दावेदार नाही. या दावा न केलेल्या ठेवी सार्वजनिक बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे (RBI) हस्तांतरित केल्या आहेत.
RBI कडून UDGAM केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू
RBI ने या वर्षी एप्रिलमध्ये पोर्टल लॉन्च करण्याचा आपला प्लॅन जाहीर केला होता. RBI च्या 17 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या नवीनतम प्रेस रिलीझनुसार, UDGAM पोर्टल लोकांना अघोषित ठेवी शोधण्यात मदत करेल. वेब पोर्टल लॉन्च केल्याने वापरकर्त्यांना त्यांच्या अघोषित ठेवी आणि खात्यांशी संबंधित माहिती मिळण्यास मदत होईल आणि त्यांना ठेवी रक्कम मागण्याची किंवा त्यांच्या संबंधित बँकांमध्ये ठेवी खाते चालू ठेवण्याची परवानगी मिळेल. Reserve Bank Information Technology Pvt. Ltd. (ReBIT), Indian Financial Technology & Allied Services (IFTAS) आणि सहभागी बँकांनी पोर्टल विकसित करण्यासाठी सहयोग केला आहे. RBI च्या मते, फेब्रुवारी 2023 पर्यंत, 35,000 कोटी रुपये ठेवी अघोषित होत्या. या वर्षी सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे (PSB) RBI मध्ये हस्तांतरित करण्यात आली होती.