• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव: कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना

Our Media by Our Media
August 28, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ, शेती
Reading Time: 1 min read
98 1
0
कपाशी
14
SHARES
708
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 28 : जिल्ह्यातील काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून, शेतकरी बांधवांनी वेळीच उपाययोना कराव्यात, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व त्यांच्या पथकाने बाळापूर तालुक्यात व्याळा, खिरपुरी  येथे प्रक्षेत्र भेट दिली, त्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला. अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्यातील काही भागातही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या व सध्या फुले, पात्या व लहान बोंड धारण केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. चिमलेल्या किंवा डोमकळीसदृश्य अवस्थेत असलेल्या प्रत्येक फुलात गुलाबी बोंडअळी आढळून आली. असे फुल अलगदपणे निघून येते.

अशा कोमेजलेल्या फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीची दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी फुलांमधून कोवळ्या बोंडामध्ये शिरताना आढळून आली आहे. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सद्य:स्थितीत 10 ते 20 टक्के आढळून आला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकरी बांधवांनी पिकाचे निरीक्षण करावे. असा प्रादुर्भाव इतरही भागात फुले अवस्थेत असणाऱ्या कपाशी पिकावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्या, असे आवाहन श्री. किरवे यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 कपाशीचे पिक 50 ते 60 दिवसांचे झालेल्या भागात फूल लागण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत गुलाबी बोंडअळीची मादी उमलत असलेल्या फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून सूक्ष्म अळ्या बाहेर येऊन फुलांमध्ये प्रवेश करतात व उमलणाऱ्या पाकळ्या आतून तोंडातील धाग्यांच्या सहाय्याने बंद करून अळी फुलांमध्ये उपजीविका करते. अशी प्रादुर्भावग्रस्त फुले न उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात व ती आपण सहज ओळखू शकतो. अशा फुलांना ‘डोमकळी’ म्हणतात. त्यात हमखास गुलाबी बोंडअळी आपली उपजीविका करताना दिसते. फुलांच्या आतील भाग अळीने खाल्यामुळे बहुदा फुलांचे रूपांतर बोंडामध्ये होत नाही व ते गळून पडतात व फुलाचे रूपांतर बोंडामध्ये झाल्यास अळी बोंडामध्ये शिरून बोंड पोखरते. त्यामुळे नुकसान होते.

   शेतकरी बांधवांनी खालील उपाययोजना कराव्यात.

  1. नत्र खते व संजीवकांचा शिफारसीप्रमाणे वापर करावा.
  2.  गुलाबी बोंडअळीवर पाळत ठेवण्यासाठी पीक उगवणीनंतर 40 ते 45 दिवसानंतर फेरोमन सापळ्यांच्या वापर करावा. यासाठी एकरी दोन किवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे  लावावे सतत दोन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाययोजना करण्यात याव्यात.
  3. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळीसहित नष्ट कराव्या म्हणजे पुढील प्रादुर्भाव रोखता येईल.
  4.  पीक उगवणीनंतर 35 ते 40 दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा ऑझेडिरेक्टीन 3000 पीपीएम 40 मिलीप्रति 10 लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  5. पीक उगवणीनंतर 55 ते 60 दिवसांनी 12 ते 15 दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा ट्रायडियाबॅक्टी  किवा किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली/10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  6.  फुलामध्ये प्रादुर्भाव पाच टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरिफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली/10 लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
  7.  प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  8. जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांवर आहे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका मिश्र कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के + लॅब्डासायह्लोथ्रीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + ऑसीटामीप्रीड 7.7 टक्के 10 मिली.
Previous Post

जिल्ह्यातील 4 पारधी वस्त्यांवर सुरू होणार बालसंस्कार केंद्रे

Next Post

महत्वाची बातमी तुम्ही बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI च्या या साइटवर तपासा…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
RBI

महत्वाची बातमी तुम्ही बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI च्या या साइटवर तपासा...

rain-2 (1)

राज्‍यातील 'या' जिल्ह्यांना उद्या पावसाचा यलो अलर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.