अकोला, दि. 23 : जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून अकोला जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या सहकार्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व सीपीआर कार्यशाळा उद्या, गुरूवारी (दि. 24 ऑगस्ट) नियोजनभवनात दु. 2 ते 5 या वेळेत होणार आहे.
शिबिरात रक्तदाब, रक्तशर्करा आदींबाबत तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले जाईल. सीपीआर कार्यक्रमात प्रथमोपचाराची क्रिया, प्रात्यक्षिक, सराव व चर्चासत्र होईल. सर्व विभागप्रमुख, विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांनी दुपारी 2 वाजता नियोजनभवनात उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.