• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, April 3, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रवाशाच्या बॅगेत सापडले तब्बल २४ कोटींचे अंमली पदार्थ

Our Media by Our Media
August 22, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ
Reading Time: 1 min read
125 1
0
drugs
18
SHARES
899
VIEWS
FBWhatsappTelegram

नागपूर : डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाने व्यापार प्रतिबंधित ‘ॲम्फेटामाइन’ प्रकारचे 24 कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे 3.07 किलो अंमली पदार्थ नागपूर विमानतळावरून जप्त करण्यात आले. नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) अधिकाऱ्यांनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  20 ऑगस्ट रोजी केनियातल्या नैरोबी येथून शारजाह युएईमार्गे आलेल्या एका भारतीय नागरिकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 3.07 किलो ‘ॲम्फेटामाइन प्रकारचा पदार्थ’ जप्त केला. हा प्रवासी शारजाहून एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9-415 ने नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याने त्याच्या सामानात आयताकृती पुठ्ठयाच्या खोक्यातील वेष्टित पोकळ धातूचा रोलर ठेवलेला होता. यामध्ये हा प्रतिबंधित पदार्थ लपवलेला होता.

संबंधित प्रकरणातील व्यक्तीला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, नागपूर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला डीआरआय कोठडी सुनावली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची अधिक चौकशी घेण्यात आली. यावेळी त्याने दिलेल्या माहितीनुसार तो, नायजेरियन नागरिकाला हा प्रतिबंधित पदार्थ विकला जाणार होता. यानंतर संबंधित नायजेरियन नागरिकाला प्रतिबंधित पदार्थ पुरवला जाणार होता. या नागरिकाला देखील अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीच्या सुभाषनगर परिसरातून सोमवारी (दि. 21) अटक केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ॲम्फेटामाइन या पदार्थाच्या व्यापारावर बंदी

ॲम्फेटामाइन हे अंमली औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा, 1985 च्या अनुसूची अंतर्गत समाविष्ट असलेला एक सायकोट्रॉपिक(व्यक्तीच्या मनावर परिणाम करणारा) पदार्थ आहे. याचा  व्यापार प्रतिबंधित आहे.

नागपुरात अंमली पदार्थ, सोने तस्करीचे प्रमाण वाढले

नागपुरात गेल्या काही दिवसात अंमली पदार्थ, सोने तस्करीचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण एअर अरेबियाच्या विमानाने नागपुरात आल्यानंतर या साहित्याची खेप मध्य भारतात इतरत्र रवाना करतात असे दिसून आले आहे. नागपूरसारख्या छोट्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ॲम्फेटामाइन हा अंमली पदार्थ सापडणे म्हणजेच या व्यवसायात गुंतलेल्या सिंडिकेट मार्फत नवनवीन पद्धती आणि ठिकाणांवर लक्ष केंद्रित असल्याचे हे द्योतक असून डीआरआय देखील अशा व्यक्तींवर नजर ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Previous Post

राज्यात ‘कांदा महाबँक’ संकल्पना राबवणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पोस्टाच्या निवृत्तीधारकांसाठी सप्टेंबरमध्ये पेंशन अदालत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
post office

पोस्टाच्या निवृत्तीधारकांसाठी सप्टेंबरमध्ये पेंशन अदालत

अकोला

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आरोग्य तपासणी शिबिर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.