आगिखेड : पातूर ते आगिखेड धाबा, महान मार्गे अमरावती प्रवासासाठी महत्वाचा व जणते साठी मुख्य रस्ता आहे. नागरीकांना तालुक्याच्या ठिकाणी विवीध कार्यालयीन कामासाठी व मुख्य बाजापेठेतील खरेदी साठी नेहमीच प्रवास करावा लागतो.तसेच शालेय विद्यार्थी व शिकवणी वर्ग साठी अनेक चिमुकले जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात.आपला पाल्य सुरक्षित परत घरी येईल का नाही. ही पालकांना चिंता असते. या रस्त्याने प्रवास करणे खुप कठीण झाले आहे. कारण खड्डा चुकवतान कधी समोरचे वाहन सामोरा समोर धडकेल याची काही शाश्वती नसते.असे प्रकार घडून अनेक गंभीर अपघात झाले आहेत.
गावात जर कोणी रुग्ण आजारी असेल तर तालुक्याच्या ठिकाणी रुग्णाला दवाखान्यात उपचारा साठी आणताना खूप कसरत करावी लागते. या रस्त्याला अनेक दुर्गम गावे व खेडी जोडली आहेत.जर महापूर,भूकंप,आग, भुसखलन सारखी नैर्गिक आप्ती आल्यास शासस्तरावरून तातळी ची मदत नागरिकांना कशी मिळेल? असा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लोकप्रतिनिधी यांनी रस्त्याच्या दुरूस्ती साठी पाठपुरावा करावा व हा रास्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा ही मागणी जनतेतून होत आहे.