ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्व मराठी कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. माहितीनुसार, गेल्या १५ दिवसांपासून जयंत सावरकर यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. यानंतर आज सकाळी त्यांचे दुख:त निधन झाले.
अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागरमध्ये झाला. त्यांनी एकूण त्यांना २१ भावंडे होती. दररोज सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढायचा आणि तो चालत जावून विकायचा हा त्यांच्या कुटूंबियांचा दिनक्रम असायचा. सावरकरचा मोठा भाऊ मुंबईत नोकरीस असल्याने ते गिरगावात राहू लागले. तेथेच नोकरी करू लागले.
यानंतर नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी बारा वर्षे ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहान- लहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. कधी- कधी ते साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत होते. पहिल्यांदा त्यांना आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात मा. दत्ताराम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी अनेक नाटकात अभिनयाचा ठसा उमठवला.