अकोला,दि.13: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजासाठी (चांभार, ढोर, होलार, मोची इ.) विविध योजना राबविले जातात. चर्मकार समाजाचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात जातात. तसेच केंद्र व राज्य शासनामार्फत एनएसएफडीसी योजना राबविली जातात. या शासकीय योजनाचा चर्मकार समाजानी लाभ घ्यावा, असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेस 1 लाख, 1 लाख 50 हजार व 2 लाख रुपये, चर्मोद्योग 2 लाख, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी 50 हजार रुपये योजनांसाठी मागील प्रलंबित नस्तींकरिता 22.21 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षात एनएसएफडीसीच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत स्मॉल बिझनेस 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिा समृद्धी योजना प्रत्येकी 1 लाख 40 हजार रुपये तसेच नवीन महिला अधिकारीता योजना 5 लाख मंजूर झालेले आहेत. एनएसएफडीसी शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये 20 लाख रुपये व विदेशामध्ये 30 लाखपर्यंत कर्ज मंजूर केल्या जातात. अधिक माहितीसाठी नजीकच्या महामंडाळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी, असे कळविण्यात आले आहे.