• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उत्तर भारतात मुसळधार पण पावसाने ‘या’ राज्यांकडे फिरवली पाठ!

Our Media by Our Media
July 12, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय, शेती
Reading Time: 1 min read
89 1
0
अलर्ट मोडवर
13
SHARES
645
VIEWS
FBWhatsappTelegram

एकीकडे उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्‍टीमुळे पाच राज्‍यांमधील पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले असून, १०० हून अधिक नागरिक मृत्‍यूमुखी पडले आहेत. एकीकडे काही राज्‍यांमध्‍ये पावसाचे थैमान सुरु असताना दुसरीकडे देशातील १२ राज्‍यांकडे पावसाने पाठ फिरवल्‍याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, तमिळनाडू वगळता सर्व दक्षिणेकडील राज्यांमध्ये या वर्षी 1 जून रोजी मान्सून सुरू झाल्यानंतर या हंगामात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

पावसाला का झाला विलंब?

पश्‍चिमी चक्रावत आणि मान्सून वाऱ्यांमुळे मागील पाच दिवस उत्तर भारतात अतिवृष्‍टी झाली. दुसरीकडे, अशी १२ राज्ये आहेत, जिथे कमकुवत मान्सूनमुळे पावसात कमालीची घट झाली आहे. भारतीय हवामान विभागाने म्‍हटले आहे की,. दक्षिण भारतातील मान्सून त्याच्या सुरुवातीपासूनच कमकुवत आहे, मुख्यतः चक्रीवादळ बिपरजॉयच्या प्रभावामुळे, पावसाला विलंब झाला आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस तुरळकच

तेलंगणा, केरळ, कर्नाटक, बिहार आणि झारखंड या मध्य, दक्षिण आणि ईशान्येकडील राज्ये अजूनही कमकुवत मान्सूनमधून जात आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या मान्सूनसाठी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पावसाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, तामिळनाडू वगळता सर्व दक्षिणेकडील राज्यांमध्ये या हंगामात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

पिकांच्या पेरणीला लांबणीवर

जुलैच्या पहिल्या आठवड्यात दक्षिणेकडील, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस मर्यादित होता. मुख्य भूभागावर फारसा पाऊस झाला नाही. याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळच्या काही भागांत पिकांच्या पेरणीला उशीर झाला आहे. कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्‍याचे जाहीर केले आहे. या राज्‍यांमध्‍ये पिकांच्‍या पेरणी लांबणीवर पडले आहे.

तेलंगणात मागील वर्षाच्‍या तुलनेत ६५ टक्‍के तूट

तेलंगणा स्टेट डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग सोसायटी (टीएसडीपीएस) नुसार, राज्यात १ जून ते ११ जुलै या कालावधीत केवळ १५०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच साधारण १९७.५ मिमी पावसापेक्षा खूपच कमी पाऊस झाला. गेल्या वर्षी या कालावधीत राज्यात ३९५.६ मिमी अतिवृष्टीची नोंद झाली होती. ‘टीएसडीपीएस’ बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलंगणामध्ये ६५ टक्के पावसाची तूट आहे. त्यात म्हटले आहे की, २४ जूनपासून मान्सून सुरू झाला आणि तो अनियमित झाला. विकाराबाद, संगारेड्डी, सिद्धीपेठ आणि नारायणपेट येथे सरासरीपेक्षा किंचित जास्त पावसाची नोंद झाली आहे. बाकी सर्व २९ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे.

कर्नाटककडेही पावसाची पाठ

कर्नाटककडेही पावसाने पाठ फिरवली आहे. बंगळूरसाठी एक महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या कृष्णराजसागर (KRS) धरणासारखी मोठी धरणे जवळपास कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याची पातळी कमाल १२४.८ फुटांपेक्षा ३० फूट खाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीपातळी १०६.५ फूट होती. त्याचवेळी हैदराबाद आणि कर्नाटक भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तुंगभद्रा धरणात सध्या फक्त ४.१ टीएमसी पाणीसाठा आहे, गेल्या वर्षीच्या ४३.९ टीएमसीपेक्षा खूपच तो कमी आहे. कर्नाटक स्टेट नॅचरल डिझास्टर मॉनिटरिंग सेलच्या मते, कर्नाटकातील कावेरी आणि तुंगभद्रा सारख्या नद्यांना पाणी पुरवणाऱ्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाळ्याच्या पहिल्या 35 दिवसांमध्ये सरासरीच्या एक तृतीयांशपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

केरळमध्‍ये ३१ टक्‍के पावसाची कमतरता

केरळमधील अनेक भागात ३१ टक्के पावसाची कमतरता आहे. इथे पाऊस फारच कमी पडतो. केरळ आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर केरळमधील काही भाग वगळता इतर बहुतांश भागात कमी पाऊस झाला असून, १४ पैकी ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्र कमतरता आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश मुसळधार पावसाचा इशारा

आयएमडीचे शास्त्रज्ञ जेनामानी यांनी सांगितले की, पश्चिमी चक्रवात आणि मान्सून वाऱ्याच्या मिश्रणामुळे उत्तरेला मुसळधार पाऊस पडला. ते पूर्वेकडे सरकले असून येत्या काही दिवसांत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात दबाव निर्माण होऊन काही दिवसांत दक्षिण भारतात पाऊस पुन्हा सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे.

‘या’ राज्‍यांत पावसाचा अभाव

पूर्वेकडील बिहार राज्यात 33 टक्के, झारखंड 43 टक्के आणि ओडिशामध्ये २६ टक्के कमी पाऊस झाला. मात्र, पश्चिम बंगालमध्ये पुरेसा पाऊस झाला आहे. आसाम वगळता ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये पावसाची कमतरता आहे. मात्र, या राज्यांमध्ये पडलेल्या पावसाची सरासरी देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

Previous Post

खरीप हंगाम पिकस्पर्धेसाठी अर्ज मागविले शेतकरी बांधवानी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

मुख्यमंत्री शिंदे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला ठाण्यामधून उद्यापासून सुरुवात

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला ठाण्यामधून उद्यापासून सुरुवात

शेतकरी गट पोहोचविणार घरपोच भाजीपाला

किरकोळ महागाई दर 4.81 टक्क्यांवर भाजीपाला दरात मोठी वाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.