अकोला दि.4 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णासाहेब साठे विकास महामंडळमार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहे. सन 2023 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी, पदवी, पदवित्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी व इत्तर अभ्यासक्रमामध्ये मातंग समाज व तत्सम 12 व पोटजातीतील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील अशा महामंडळाकडून गुणानुक्रमांक नुसार उपलब्ध निधिच्या अधिन राहून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृती मंजुर करण्यात येते. पात्र इच्छुक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, फोटो, गुणपत्रिका व पुढिल वर्गात प्रवेश घेतल्याबाबतचा बोनाफाईड प्रमाणपत्र जोडून शनिवार दि. 15 जुलैपर्यंत जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, कौलखेड रोड, नालंदा नगरच्या बोर्डजवळ, आरोग्य नगर चौक, अकोला येथे दोन प्रतित अर्ज करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाहि, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक आनंद वाडीवे यांनी केले.